Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

Pune Crime: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवलं. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी बायको सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनला अटक केली.
Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत
Ketan Agarwal CaseSaam Tv
Published On
  • केतन अग्रवाल हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर आला

  • सिया आणि चेतन कॅफेमध्ये भेटल्याचा व्हिडीओ समोर आला

  • १७ जून रोजी पुण्यातील कॅफेमध्ये दोघे सुमारे एक तास बसले होते

  • या कॅफेमध्येच केतनच्या हत्येचा प्लान आखला गेला

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्या प्रकरणात पोलिसांना महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. केतनच्या हत्येआधी सिया आणि चेतन भेटले होते. त्यांचा एका कॅफेमधील टेबलवर गप्पा मारत बसलेला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. सियाने बॉयफ्रेंड चेतनच्या मदतीने होणारा नवरा केतनची हत्या केली. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे केतनच्या हत्येच्या एक दिवस आधी पुण्यातील एका कॅफेमध्ये भेटले होते. त्याच ठिकाणी बसून दोघांनी केतनच्या हत्येच्या कटावर चर्चा केली होती. हे दोघे १७ जून रोजी सायंकाळी पुण्यातील थर्ड वेव्ह कॅफमध्ये गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन दुपारी ४.३५ वाजताच्या सुमारास कॅफेत गेले. ते तिथे जवळपास एक तास थांबले होते. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ते कॅफेतून बाहेर पडले.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत
Pune Crime: बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सिया आणि चेतननं 14 जूनलाच आखला होता कट

तपास यंत्रणांनी दावा केला आहे की, चेतन आणि सिया यांनी या कॅफेमध्ये झालेल्या भेटीदरम्यान केतनच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी मिळवलेल्या डिजिटल पुराव्यांवरून आणि चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, ते दोघे कॅफेमध्ये भेटले आणि त्यांनी केतनच्या हत्येचा तिथेच बसून प्लान आखला. या प्रकरणातला आणखी एक पैलू समोर आला आहे. तपासातून असे उघड झाले आहे की, सिया गोयलने घटनेपूर्वी युट्यूबवर लोहगड किल्ल्याचे व्हिडीओ शोधले होते. पोलिसांनी दावा केला की, तिने या ठिकाणाची माहिती चेतन चौधरीला दिली होती. ती माहिती एका कटाचा भाग असू शकतो असा संशय अधिकाऱ्यांना आहे.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत
Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

या प्रकरणाचा तपास आता फक्त सीसीटीव्ही पुरता मर्यादीत राहिला नाही. पोलिस मोबाईल फोन, चॅट रेकॉर्ड, इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि दोन्ही आरोपींमधील संभाषणांचीही तपासणी करत आहेत. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, हा डिजिटल पुरावा या प्रकरणात महत्वाचा दुवा ठरू शकतो. १८ जून रोजी सिया आणि चेतनने केतनची हत्या केली. त्यांनी लोहगडावरून केतनला दरीत ढकलून दिले. गंभीर जखमी झालेल्या केतनचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत
Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com