पुण्यात १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; ऐतिहासिक कार्यक्रमाचे वेळापत्रक

100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Pune 2027 Dates: पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान ऐतिहासिक १००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून, राज्यभर ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे या संमेलनाची भव्य नांदी होणार आहे.
Preparations underway for the historic 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan at Savitribai Phule Pune University, scheduled in January 2027.
Preparations underway for the historic 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan at Savitribai Phule Pune University, scheduled in January 2027.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.

Preparations underway for the historic 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan at Savitribai Phule Pune University, scheduled in January 2027.
तुकाराम मुंढेंचं धडाडीचं पाऊल; गुटखा उत्पादक, वाहतूकदार अन् पुरवठादारावर थेट मकोका; धाबे दणाणले

संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी दि. १३ जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.

Preparations underway for the historic 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan at Savitribai Phule Pune University, scheduled in January 2027.
Petrol Rules: घरात किती पेट्रोल साठवावे? नियम आताच घ्या जाणून, नाहीतर...

बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

Preparations underway for the historic 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan at Savitribai Phule Pune University, scheduled in January 2027.
Mumbai Pune : High-Speed रेल्वेचा ३८० प्रति किमीचा स्पीड, मुंबई ते पुणे प्रवास पूर्ण होणार फक्त ४८ मिनिटात

नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com