Sakshi Sunil Jadhav
सध्या होणाऱ्या पश्चिम आशियातल्या तणावामुळे देशामध्ये पेट्रोलच्या कमीची भीती निर्माण झाली आहे. पण सरकारने स्पष्ट केले आहे की इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पण अशा वेळी नागरिकांनी नियम समजून घेणं आवश्यक आहे.
तुम्ही परवानगी शिवाय घरात जास्तीत जास्त 30 लिटर पेट्रोल किंवा डिझेल साठवू शकता.
पेट्रोलियम अॅक्ट 1934 आणि पेट्रोलियम रूल्स 2002 नुसार हे नियम लागू आहेत. त्यामुळे तुम्हाला 30 लिटरपर्यंत साठवणूक करता येते.
तुमच्याकडे जर 30 लिटरपेक्षा जास्त साठा असेल तर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते.
पेट्रोल नेहमी प्रमाणात आणि सुरक्षित कंटेनरमध्येच ठेवणं बंधनकारक आहे. स्वयंपाकघर किंवा राहत्या खोलीत पेट्रोल ठेवणं अत्यंत धोकादायक असू शकतं.
पेट्रोल गॅरेज, शेड किंवा हवेशीर जागेतच ठेवणं जास्त सुरक्षित मानलं जातं.
पेट्रोलजवळ सिगारेट, आग किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवू नका.
साध्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल साठवणे टाळावे, यामुळे अपघाताचा धोका वाढतो. सरकारनुसार इंधन पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे अनावश्यक साठा करण्याची गरज नाही.