नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी

New Mumbai Metro Expansion : महाराष्ट्र सरकारने गायमुख-फाउंटन हॉटेल बोगदा आणि भाईंदर उन्नत पूल प्रकल्पासह २८ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होईल.
New Mumbai Metro Expansion :
NAVI MUMBAI GETS BIG INFRA BOOST! 28 KM METRO ROUTE AND GAIMUKH-BHAYANDAR PROJECTS APPROVEDsaam tv
Published On
Summary
  • नवी मुंबई आणि ठाणे परिसरासाठी 28 किमीच्या मेट्रो मार्गाला मंजुरी

  • गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला मंजुरी

  • मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला सरकारनं मंजुरी दिली आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि गुजरातकडे जाणारा प्रवास अधिक जलद होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ठाणे-घोडबंदर मार्गावरील हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

New Mumbai Metro Expansion :
Vande Bharat : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ३ दिवस धावणार; जाणून घ्या वेळापत्रक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत तब्बल २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

New Mumbai Metro Expansion :
खुशखबर! रेल्वे तिकीट बुक करणे होणार अधिक सोपे, IRCTC मध्ये मोठा बदल

या प्रकल्पांतर्गत गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचे बांधकाम अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार आहे.

याचा व्यास १४ मीटर असणार आहे. दरम्यान पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलंय. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर राबविण्यात येईल. यासह सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग १ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-४) विस्तार प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा २८ किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग १ए वर दोन तर मार्ग २ वर ११ स्थानकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com