Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

Girl Jumped From 8 Floor Of Building: पुण्यातील वाघोली येथील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना दुपारी १२:३० च्या सुमारास भावडी रोडवर घडली, पोलिस तपास सुरू आहे.
Girl Jumped From 8 Floor Of Building
Police and residents gather at a Wagholi society on Bhavadi Road after an 18-year-old girl allegedly jumped from the eighth floor.saam tv
Published On
Summary
  • वाघोलीतील भावडी रोडवरील सोसायटीत घटना घडली.

  • १८ वर्षीय तरुणीने आठव्या मजल्यावरून उडी मारली.

  • दुपारी १२.३० च्या सुमारास प्रकार उघडकीस आला.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यात वाघोलीतमधील एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. ही घटना भावडी रोडवरील एका सोसायटीमध्ये घडली.

हाती आलेल्या माहितीनुसार,ही घटना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सारा लालमन अंधारे ( वय १८, सध्या रा. वाघोली, मूळ रा. करमाळा, ता. सोलापूर ) ही तरुणी १२.३० च्या सुमारास एका लिफ्टने इमारतीच्या आठव्या मजल्यावर आली. तिथे तिने आपले बूट काढले आणि सरळ खाली उडी टाकली. ती खाली पडल्यानंतर धपकाक असा मोठा आवाज झाला.

Girl Jumped From 8 Floor Of Building
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील नागरिकांचे लक्ष गेलं. त्यावेळी त्यांना सारा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवून तिला खासगी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ती ११ वी इयत्तेत शिकत होती. ती मूळची सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील राहणारी होती. वर्षभरापासून ती आपल्या आईसह मामाकडे राहत होती. ही घटना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भावडी रोड वरील एका सोसायटी मध्ये घडली.

Girl Jumped From 8 Floor Of Building
Pune News : नगरच्या व्यक्तीचा सिंहगड किल्ल्यावर मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?

घटनेची माहिती मिळताच वाघोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रागाच्या भरात तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी सांगितले. परंतु तिने अजून कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली का याचा तपास केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com