Pune Accident:  पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Pune AccidentSaam Tv

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Pune Truck And Bike Accident: पुण्यातील कात्रजमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की अपघातामध्ये ३ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
Published on

Summary -

  • पुण्यातील कात्रज भागात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

  • अपघातामध्ये ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • वडिलांच्या डोळ्यासमोर चिमुकल्याने सोडले प्राण

  • ही अपघाताची घटना कात्रजमध्ये घडली

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देत ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं. या अपघातामध्ये वडिलांच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील कात्रज भागामध्ये घडली. चिमुकला वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

Pune Accident:  पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, ३ जणांचा जागेवरच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजमध्ये ट्रकच्या धडकेत ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रकने आधी दुचाकीला धडक दिली त्यानंतर मुलाला चिरडलं.

Pune Accident:  पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Chembur Accident : मुंबईत भंयकर दुर्घटना, ८ व्या मजल्यावरून ६ कामगार पडले

वडील आपल्या ३ वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकला दुचाकीवरू खाली पडला. त्यानंतर डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव अंश भाऊरंग कांबळे असे होते. तो कात्रजच्या अंजनीनगरमध्ये राहत होता. या प्रकरणी ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय ५० वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ट्रक चालक मूळचा लातूरच्या निलंगा येथील आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज आणखी एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील कात्रज आणि परिसरातील वाढते अपघात कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune Accident:  पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Accident News : मध्यरात्री महामार्गावर भयंकर अपघात, सहा वाहने एकमेकांना धडकली अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com