मोठी बातमी! कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

ajit pawar : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव पास करण्यात आला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam tv
Published On
Summary

कात्रज दूध संघाच्या नामकरणाचा ठराव मंजूर करण्यात आलाय

संघाला अजितदादा पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय

संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव पारित झालाय

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कात्रज दूध संघाने "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज" असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आलाय.

Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याने सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ही हानी पुणे जिल्ह्यातील दूध संघासाठी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आलीये. अजित पवार यांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिलंय. ते संघाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहिले होते. पवार कुटुंबाचं सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध प्रयत्नांना सातत्याने सहकार्य मिळालंय.

संघाच्या पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन नियोजनासाठी “संघाला बळकट करणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संस्थात्मक उभारणीला प्राधान्य देणे आणि सहकारी संस्थांना सक्षम बनविणे या व्यापक दृष्टिकोनातून संघाला मिळालेले पाठबळ आम्ही कायम स्मरणात ठेवू,” अशी भावना संचालकांनी व्यक्त केलीये.

Ajit Pawar
अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी, निव्वळ पोकळ दावे; प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष तानाजी जगताप, संचालक गोपाळ म्हस्के, बाळासाहेब नेवाळे, विष्णु हिंगे, बाळसाहेब खिलारी, दिलीप थोपटे, केशरताई पवार, भगवान पासलकर, राहुल दिवेकर, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, भाऊसाहेब देवाडे, निखिल तांबे, लता गोपाळे, चंद्रकांत भिंगारे, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
दारूसाठी पैसे दिले नाही; मुलगा आईवर भडकला, रागात हादरवणारं कृत्य केलं

अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नाही. तर “संघाच्या कार्यात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान संस्थेच्या नावातून कायम राहावा,” असा उद्देश या नामकरणामागे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com