

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका केली
अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
SC, ST, OBC, शेतकरी आणि मध्यमवर्गासाठी ठोस तरतुदी नाहीत, असेही आंबेडकरांनी म्हटलं
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज रविवारी अर्थसंकल्प सादर केलाय. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडलाय. भारताच्या अर्थसंकल्पावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. अर्थसंकल्पातून निव्वळ 'पोकळ दावे' असल्याची आंबेडकरांनी टीका केली.
'केवळ श्रीमंतांसाठी असलेला अर्थसंकल्प' असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अर्थसंकल्पात SC, ST आणि OBC समाजासाठी कोणत्याही ठोस धोरणात्मक तरतुदींचा किंवा त्यांच्या फायद्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असे आंबेडकर म्हणाले.
अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा खेळ केलाय. मध्यमवर्गीयांना कर सवलतीची अपेक्षा होती. परंतु त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. वाढत्या महागाईतून सुटका करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलले नाहीत, अशी टीकाही आंबेडकरांनी केली.
'किमान आधारभूत किमतीला कोणतेही कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीही ठोस नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह
रुपयाचं घसरते मूल्य आणि भांडवली ओघ कमी होणे यांसारख्या गंभीर आर्थिक समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या बिगर-भाजप शासित राज्यांना त्यांचा योग्य वाटा न देता डावलले, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया दिली?
अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी असून त्यात निव्वळ पोकळ दावे असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शेतकऱ्यांबाबत प्रकाश आंबेडकरांनी काय मुद्दा उपस्थित केला?
किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर संरक्षण देण्यात आलेलं नाही, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.