दारूसाठी पैसे दिले नाही; मुलगा आईवर भडकला, रागात हादरवणारं कृत्य केलं

uttar pradesh crime news : उत्तर प्रदेशात तरुणाने रागात हादरवणारं कृत्य केलं आहे. दारूसाठी पैसे देत नसल्याने मुलाने आईची हत्या केली.
Uttar pradesh news
Uttar pradesh Saam tv
Published On
Summary

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाचा आईवर हल्ला

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

रुग्णा्लयात उपचारादरम्यान माया देवीचा मृत्यू

नशेच्या आहारी गेलेला व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो. दिवसभर दारूच्या नशेत राहणारा व्यक्ती काय करेल, सांगता येत नाही. अशाच एका तरुणाचा हादरवणारा प्रताप समोर आला आहे. २४ तास नशेत असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रामपुरातील व्यक्तीने हादरवणारं कृत्य केलं आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने नशेत मुलाने आईची हत्या केली आहे. या प्रकरणात आरोपींनी मुलाला अटक केली आहे.

Uttar pradesh news
Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या? मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

मिळालेल्या माहितीनुसार, रामपूरच्या शाहाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जागेश्वर गावातील रोनी नावाच्या तरुणीने सख्ख्या भाऊ राजू भारतीच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. आरोपी राजू भारतीने आई माया देवीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु आईने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला.

Uttar pradesh news
मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

आईने दारूसाठी पैसे न दिल्याने राजू भारती भडकला. त्याने आईला विटाने मारण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात राजू भारती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर माया देवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रामपूर अनुराग सिंह यांनी सांगितलं की, आईने मुलाला दारूसाठी पैसे न दिल्याने वीट फेकून मारली. या घटनेत माया देवी गंभीर जखमी झाली. माया देवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माया देवीच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. माया देवीच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

Uttar pradesh news
राजकारणात मोठा उलटफेर; ठाकरे महापौर होणार, भाजपकडून घोषणा

या घटनेनंतर माया देवीच्या मुलीने भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतलं. गावातील लोकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com