Chembur Accident : मुंबईत भंयकर दुर्घटना, ८ व्या मजल्यावरून ६ कामगार पडले

Mumbai Building Site Accident : मुंबईतील चेंबूरमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू होते, त्यावेळी भयंकर दुर्घटना घडली. आठवड्या मजल्याहून ६ कामगार खाली पडल्याचे समोर आले. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर ५ जण गंभीर जखमी आहेत.
Mumbai Building Site Accident
Mumbai Building Site AccidentSaam TV Marathi News
Published On

मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Chembur construction site accident details : मुंबईमधील चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली पडल्याने मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष नगरमधील एका नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. ६ कामगार आठव्या मजल्यावर काम करत होते. अचानक तांत्रिक बिघाड किंवा तोल गेल्याने हे कामगार थेट खाली कोसळले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे काम करताना या कामगारांनी कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट किंवा सुरक्षिततेची साधने वापरली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Mumbai Building Site Accident
Plane Crash : नोटा घेऊन जाणारे लष्काराचे विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू, अपघातानंतरचा भयानक व्हिडिओ

दुर्दैवी घटनेनंतर तत्काळ जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बांधकाम करताना सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रप्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Mumbai Building Site Accident
Mumbai News : अंधेरीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिलांसोबत रंगेहाथ पकडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com