Mumbai sex racket
Mumbai sex racketSaam Tv

Mumbai News : अंधेरीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिलांसोबत रंगेहाथ पकडले

Mumbai sex racket : मुंबईतील अंधेरी परिसरात हॉटेल व्हिला पॅलेस येथे चालणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा सहार पोलिस यांनी पर्दाफाश केला. चार जणांना अटक तर दोन विदेशी महिलांची सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Published on

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai crime news today : मुंबई अंधेरीतील ‘हॉटेल व्हिला पॅलेस’मध्ये विदेशी महिलांना हाताशी धरून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत हॉटेलचा मॅनेजरसह चार जणांना अटक करण्यात आली असून दोन विदेशी महिलांची सुटका करण्यात आली आहे.

सहार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अंधेरीतील ए. के. रोडवरील ‘व्हिला पॅलेस’ या हॉटेलमध्ये काही विदेशी महिलांना नोकरीच्या आमिषाने भारतात बोलावून जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाची मदत घेत सापळा रचला.

Mumbai sex racket
Plane Crash : नोटा घेऊन जाणारे लष्काराचे विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू, अपघातानंतरचा भयानक व्हिडिओ

ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकाने संबंधित आरोपींशी संपर्क साधून विदेशी महिलांची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी त्याला हॉटेलमध्ये बोलावले. बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बोगस ग्राहक हॉटेलमध्ये गेला असता, तेथील कर्मचाऱ्यांनी त्याची दोन युगांडा देशातील नागरिक असलेल्या महिलांशी ओळख करून दिली. पैशांचा व्यवहार सुरू होताच पोलिसांनी तिथे छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड केला.

Mumbai sex racket
Pakistan Air Strike : पाकिस्तानवर दिवसाढवळ्या एअरस्ट्राइक; अफगाणिस्तानचा लष्कराच्या तळावर हल्ला, बराकी केल्या उद्ध्वस्त

या कारवाईत हॉटेल मॅनेजर विवेककुमार वैद्यनाथ यादव, हाऊसकीपिंग कर्मचारी अनिलकुमार जोकू पुष्पाकर, धीरज मधुकर जांबळे आणि महेश राजपाल राजवरिया यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सहार पोलिस पुढील तपास करत असून या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच किती महिलांना अशाप्रकारे अडकविण्यात आले आहे याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे अंधेरी परिसरात खळबळ उडाली आहे.

Mumbai sex racket
Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट

छाप्यात पोलिसांनी दोन विदेशी महिलांची सुटका केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हॉटेलचा मालक अक्षय दिलीप शेटे आणि ‘जास्मिन’ नावाची केनियन नागरिक महिला हे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. दोघांनाही या प्रकरणात पाहिजे आरोपी घोषित करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे.

Mumbai sex racket
Pakistan Afghanistan conflict : ज्याची भीती होती तेच झालं, भारताच्या शेजारी युद्धाला सुरूवात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com