Pakistan Afghanistan conflict : ज्याची भीती होती तेच झालं, भारताच्या शेजारी युद्धाला सुरूवात

casualties claims in Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष तीव्र झाला असून दोन्ही देशांनी मोठ्या जीवितहानीचे दावे केले आहेत. सीमेजवळ हवाई हल्ले आणि स्फोटांमुळे युद्धाची शक्यता वाढली आहे.
Pakistan Afghanistan conflict
Pakistan Afghanistan conflictSaam TV Marathi
Published On

Pakistan Afghanistan border clash latest updates : भाराताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील संघर्ष आता टोकाला गेला आहे. अफगाणिस्तानने मध्यरात्री पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता. यामध्ये ५५ पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानच्या १५ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानला कठोर शब्दात इशारा दिलाय.

आमचा संयम आता संपलाय, आम्ही युद्ध पुकारत असल्याचे म्हटलेय. ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानच्या १३३ तालिबानी सौनिकांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हल्ले प्रति हल्ले सुरू आहेत. यामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ५५ सैनिक मारल्याचा आणि १५ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर पाकिस्तानने हवाई हल्ला करत अफगाणिस्तानचे १३३ सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

Pakistan Afghanistan conflict
Crime : बुलढाण्यात थरारक घटना! सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या, मृतदेह जाळला अन्...

आमचा संयम संपला, आता युद्ध होईल - पाकिस्तान

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक्स खात्यावरून अफगाणिस्तानविरोधात युद्धाची सुरूवात झाल्याचा दावा केला आहे. आमचा संयम आता संपला आहे, आता खुले युद्ध होईल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय जगभरातील दहशतवादी अफगाणिस्तान गोळा करत असल्याचा गंभीर आरोपही पाकिस्तानकडून कऱण्यात आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून रात्री हल्ला केल्याच्या वृत्ताला अफगाणिस्तानकडून दुजोरा देण्यात आला आहे. पाकिस्तानने राजधानी काबूल, पक्तिका आणि कंधारमधील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केला. पण यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही असा दावा तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी केला आहे.

Pakistan Afghanistan conflict
Rinku Singh father death : रिंकू सिंगवर दु:खाचा डोंगर कोसळला, वडिलांचं निधन

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव कायम

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमेवर संघर्ष सुरूच आहे. पाकिस्तानी हवाई दलाने आज रात्री (२७ फेब्रुवारी २०२६) ऑपरेशन गजब लिल हक अंतर्गत अफगाणिस्तानमधील अनेक प्रमुख तालिबानी लष्करी स्थानांवर एअर स्ट्राइक केला. या कारवाईत ७२ तालिबानी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानने सीमेवर मोठे हल्ले करत पाकिस्तानच्या डझनभर सैनिकांचा खात्मा केला आहे. तसेच अनेक चौक्यांवर कब्जा केला आहे. एएफपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पहाटे मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. १:५० वाजताच्या सुमारास शहरात लढाऊ विमानांच्या आवाजासह स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. मध्य काबूलमध्ये पहाटे २:३० वाजेपर्यंत गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते.

Pakistan Afghanistan conflict
Pakistan Afghanistan conflict : तालिबानचा थरकाप उडवणारा प्रहार, पाकिस्तानचे JF-17 विमान पाडले, ५५ सैनिकांचा मृत्यू अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com