Pakistan Afghanistan conflict : तालिबानचा थरकाप उडवणारा प्रहार, पाकिस्तानचे JF-17 विमान पाडले, ५५ सैनिकांचा मृत्यू अन्...

Pakistan Afghanistan border conflict latest update : पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष वाढलाय. गुरूवारी रात्री तालिबानकडून पाकिस्तानी विमान पाडल्याचा आणि ५५ सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे.
Pakistan Afghanistan border conflict latest update
Pakistan Afghanistan border conflict latest updateSaam
Published On

Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष आणखी वाढला असून युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काही प्रांतांवर हवाई हल्ला केला होता. त्याला गुरूवारी रात्री अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तर देण्यात आलेय. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या १५ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ५५ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबानकडून कऱण्यात आला आहे. तर पाकिस्तानकडून दावा खोडून काढण्यात आला असून फक्त २ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, अपगाणिस्तानने पाकिस्तानचे जेएफ १७ विमान पाडल्याचा दावा केला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याचा बदला म्हणून अफगाणिस्तानकडून गुरूवारी रात्री कारवाई करण्यात आली. टोलो न्यूजने अफगाण सुरक्षा दलांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की अफगाण सैन्याने अफगाण हवाई हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानी विमान पाडले आहे. तालिबानशी संबंधित अनेक माध्यमांनी पाकिस्तानी विमान पाडल्याचा दावा केला आहे. तालिबानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी विमानाला धडक दिली असावी, असेही म्हटलेय.

Pakistan Afghanistan border conflict latest update
Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, ३ जणांचा जागेवरच मृत्यू

ड्युरंड सीमेजवळील पाकिस्तानी लष्करी सरकारी चौक्यांविरुद्ध अफगाण सैन्याने प्रतिहल्ला केला. आतापपर्यंत पाकिस्तानच्या १५ चौक्या ताब्यात घेण्यात आले आहेत. या कारवाईत ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. अफगाण सैन्याने अनेक पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तालिबाननेही अनेक पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडल्याचा दावा केला आहे. लष्करप्रमुख फसिहुद्दीन फितरत यांच्या आदेशावरून पाकिस्तानवर हल्ला केला होता.

Pakistan Afghanistan border conflict latest update
NCERT : तुमची बिनशर्त माफी नको, चौकशी होणारच; आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त धड्यावर सरन्यायाधीश कडाडले

रात्रभर लढाई सुरूच

अफगाण सैन्याने पाकिस्तान सैन्याचे २ मुख्यालय आणि १९ चेकपोस्ट ताब्यात घेतल्याचा दावा अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या कारवाईत ८ अफगाण सैनिक "शहीद" झाले आणि इतर ११ जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. तोरखममधील परत आलेल्यांसाठी असलेल्या तात्पुरत्या छावणीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह १३ जण जखमी झाले आहेत.

Pakistan Afghanistan border conflict latest update
Mumbai Pune : लोणावळा-खंडाळा घाटातील 'मिसिंग लिंक' रखडला? डिसेंबर २०२५ चे आश्वासन हुकले, आता नवी तारीख जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com