NCERT : तुमची बिनशर्त माफी नको, चौकशी होणारच; आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त धड्यावर सरन्यायाधीश कडाडले

Supreme Court of India latest hearing : आठवीच्या पाठ्यपुस्तकातील न्यायपालिकेवरील वादग्रस्त मजकुरावर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका. एनसीईआरटीला हजारो प्रती मागे घेण्याचे आदेश देत प्रकाशन प्रक्रियेची चौकशी सुरू.
Supreme Court of India latest hearing
Supreme Court of India latest hearing
Published On

NCERT class 8 textbook controversy details : आठवीच्या पुस्तकातील न्याय व्यवस्थेवरील वादग्रस्त प्रकरणावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात आज NCERT ला झापले. तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेला भ्रष्ट म्हणू शकत नाही. अशा प्रकारचा मजकूर शालेय पुस्तकात असणे ही गंभीर बाब असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात वादग्रस्त प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश यांनी बिनशर्त माफी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केलेच. त्याशिवाय हे पुस्तक कसे प्रकाशित झाले, याची चौकशी केली जाईल असे सांगितले. आम्ही या संस्थेच्या प्रतिष्ठेला कलंकित होऊ देऊ शकत नाही, हे एक षडयंत्र असू शकते, असेही ते म्हणाले. (Supreme Court action on judiciary defamation)

आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' या मथळ्याखाली एक धडा छापण्यात आला होता. त्यातील मजकूर दिशाभूल करणारा असल्याचे सांगत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संपूर्ण न्यायव्यवस्थेला अशा प्रकारे लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे म्हणत सरन्यायाधीशांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणानंतर NCERT ने न्यायालयात माफी मागितली आहे. वादग्रस्त मजकूर असलेली सुमारे ३८,००० पुस्तके बाजारातून तातडीने मागे घेण्याचे आणि तो धडा हटवण्याचे आदेश न्यायालयाने NCERT दिले आहेत.

Supreme Court of India latest hearing
Marathi : मुंबईतील कॉलेजचं नावच गुजराती भाषेत, मराठीसाठी ठाकरेंची सेना आक्रमक; थेट इशारा दिला

त्या वादग्रस्त ३८ प्रतींचा शोध सुरू -

आठवीच्या पाठ्यपुस्तकातील ते वादग्रस्त प्रकरण एनसीईआरटीने (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) अखेर काढून टाकले आहे. पण ३८ प्रती एनसीईआरटीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आतापर्यंत विकल्या गेलेल्या पुस्तकाच्या ३८ प्रती परत मिळविण्याचा प्रयत्न शिक्षण मंत्रालयाकडून केला जात आहे. आतापर्यंत छापलेल्या २.२५ लाख प्रतींपैकी फक्त ३८ प्रती विकल्या गेल्या होत्य. त्यामुळे २,२४,९६२ प्रती शिल्लक राहिल्या आहेत. ANI च्या रिपोर्ट्सनुसार, विकल्या न केलेल्या सर्व प्रती एनसीईआरटीने गोदामात पाठवल्या आहेत. तर विकल्या न गेलेल्या प्रतींचा शोध केला जात आहे. न्याय व्यावस्थेवरील त्या एका प्रकरणातील मजकुरावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर एनसीईआरटीने पाठ्यपुस्तकाचे वितरण थांबवले होते. पण आतापर्यंत ३८ प्रती विकल्या गेल्या आहेत. त्या प्रतींचा शोध घेण्यात येत आहे.

Supreme Court of India latest hearing
Gold Rate Today : होळीआधी गूड न्यूज! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कोसळले; वाचा 24K, 22K आणि 18K गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com