Gold Rate Today : होळीआधी गूड न्यूज! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कोसळले; वाचा 24K, 22K आणि 18K गोल्ड रेट

24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik : सलग वाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे नवे दर समोर आले आहेत. सणासुदीपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik
24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashikSaam TV MArathi
Published On

today gold rate in Mumbai Pune Delhi : लागोपाठ ३ दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. आज अखेर या दरवाढीला ब्रेक लागला असून सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली. गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत कपात नोंदवण्यात आली. सोमवार, मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती, तर बुधवारी दर किंचित वाढले होते. आज अखेर सोन्याच्या किंमतीमध्ये कपात नोंदवण्यात आली आहे. होळीच्या सणाआधी सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा २१० रूपयांनी घसरली आहे.

अनेक दिवसांनंतर आज सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफा बुकिंगचा पर्याय निवडल्याने कपात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या. भारतात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १६,१६८ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १४,८२० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,१२६ रुपयांवर पोहचली आहे. 18k, 22k, 24k कॅरेट सोन्याची आजची किंमत किती आहे?

24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik
PM Modi : न भूतो न भविष्यति! पंतप्रधान मोदींचं इंस्टाग्रामवर 'शतक'; असा पराक्रम करणारे जगातील पहिले नेते

२४ कॅरेट सोन्याचे दर किती? Today 24 Carat Gold Rate Per Gram Mumbai Pune (INR)

  • १ ग्रॅम- ₹16,168 - २१ रूपयांनी स्वस्त

  • ८ ग्रॅम - ₹1,29,344 - १६८ रूपयांनी स्वस्त

  • १ तोळे - ₹1,61,680 - २१० रूपयांनी स्वस्त

  • १० तोळे - ₹16,16,800 - २१०० रूपयांनी स्वस्त

२२ कॅरेट सोन्याचे दर किती? Today 22 Carat Gold Price Per Gram in India (INR)

  • १ ग्रॅम- ₹14,820 - २० रूपयांनी स्वस्त

  • ८ ग्रॅम - ₹1,18,560 - १६० रूपयांनी स्वस्त

  • १ तोळे - ₹1,48,200 - २०० रूपयांनी स्वस्त

  • १० तोळे - ₹14,82,000 - २००० रूपयांनी स्वस्त

१८ कॅरेट सोन्याची आजची किंमत किती ? Today 18 Carat Gold Rate Per Gram in India (INR)

  • १ ग्रॅम- ₹12,126 - १६ रूपयांनी स्वस्त

  • ८ ग्रॅम - ₹97,008 - १२८ रूपयांनी स्वस्त

  • १ तोळे - ₹1,21,260 - १६० रूपयांनी स्वस्त

  • १० तोळे - ₹12,12,600 - १६०० रूपयांनी स्वस्त

24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik
भाजप आमदाराच्या मुलाचा टोल नाक्यावर राडा, पैसे मागितले म्हणून कर्मचाऱ्याला मारले, घटना CCTV मध्ये कैद

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय आहेत?

मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १६,१६८

  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १४,८२०

  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १२,१२६

दिल्ली

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १६,१८३

  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १४,८३५

  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १२,१४१

चेन्नई

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १६,२८९

  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १४,९३२

  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १२,७६६

कोलकाता

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १६,१६८

  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १४,८२०

  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १२,१२६

बंगळुरू

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १६,१६८

  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १४,८२०

  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १२,१२६

हैदराबाद

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: १६,१६८

  • २२ कॅरेट सोन्याचा दर: १४,८२०

  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १२,१२६

24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik
पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! प्रवासाचा वेळ वाचणार, या दिवशी सुरू होणार लोकल, कोणती असतील स्थानकं?

अमेरिकेच्या जागतिक टॅरिफ धोरणाबाबत अनिश्चितता, अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे वळाले आहे. त्यामुळेच याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या किंमतीत चढउतार सुरू आहे. याचा थेच परिणाम जागतिक बाजारपेठेवर होतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीने उच्चांक गाठलाय. भारतामध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सण उत्सवात सोनं खरेदी करण्याचा ट्रेंड असतोच, त्याचा परिणाम थेट सोन्याच्या दरवाढीवर होत असल्याचे दिसतेय.

24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik
Love jihad law : राज्यात लव्ह जिहादचा कायदा येणार, फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग, पहिला ड्राफ्ट तयार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com