PM Modi : न भूतो न भविष्यति! पंतप्रधान मोदींचं इंस्टाग्रामवर 'शतक'; असा पराक्रम करणारे जगातील पहिले नेते

Narendra Modi Instagram followers Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा पार करत जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनण्याचा विक्रम केला आहे. जागतिक नेत्यांशी तुलना आणि सोशल मीडियावरील त्यांच्या लोकप्रियतेचा आढावा.
Narendra Modi Instagram followers milestone
Narendra Modi Instagram followers milestoneSaam TV Marathi
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील दिग्गज नेत्यांना मागे टाकत इन्स्टाग्रामवर १०० मिलियन (१० कोटी) फॉलोअर्सचा डोंगर पार केला आहे. असा पराक्रम गाजवणारे मोदी हे जगातील पहिलेच नेते ठरले आहेत. फेसबुक असो वा एक्स (ट्विटर), आणि आता इन्स्टाग्राम... मोदींची लोकप्रियता सातासमुद्रापार कशी पोहोचली आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

इन्स्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करणारे मोदी हे जगातील पहिलेच नेते बनले आहेत. जो बायडेन, डोनाल्ड ट्रम्प आणि इतर जागतिक नेत्यांना लोकप्रियतेच्या शर्यतीत मागे टाकत मोदी पहिल्या स्थानावर पोहचलेय. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी इन्स्टाग्रामवर खाते उघडले होते. तेव्हापासून मागील दशकभरात सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जागतिक नेते ते बनले आहेत.

Narendra Modi Instagram followers milestone
Narendra Modi Instagram followers milestoneNarendra Modi Instagram
Narendra Modi Instagram followers milestone
कामाची बातमी! फक्त ₹२०० मध्ये सातबारा उतार्‍यावरील पोटहिश्शाची मोजणी, ९० दिवसात मोजणी; कोणत्या वेबसाईटवर कराल अर्ज?

मोदी जगात भारी -

गेल्या दशकात मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान मोदी यांचे इन्स्टा अकाउंट जगातील सर्वात सक्रिय आणि लोकप्रिय राजकीय प्रोफाइलपैकी एक झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असोत अथवा जपान, जर्मनी अन् सर्वाच देशाच्या लोकप्रिय नेत्यांपेक्षा जास्त मोदी यांचे फॉलोअर्स झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोदींचे फॉलोअर्स दुप्पट आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ४३.२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे १५ दशलक्ष फॉलो आहेत. ब्राझीलचे अध्यक्षांचे १४.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगान यांचे ११.६ दशलक्ष आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांचे ६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या पाच नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या मोदींच्या फॉलोअर्सपेक्षा कमीच आहे.

Narendra Modi Instagram followers milestone
पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! प्रवासाचा वेळ वाचणार, या दिवशी सुरू होणार लोकल, कोणती असतील स्थानकं?

भारतातील नेत्यांपेक्षाही जास्त फॉलोअर्स -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील इतर राजकीय नेत्यांमधील सोशल मिडिया फॉलोअर्समध्ये मोठा फरक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे १.६१ कोटी फॉलोअर्स आहेत. तर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सुमारे १.२६ कोटी फॉलोअर्स आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर जास्त सक्रिया असतात. प्रत्येक ठिकाणावरील फोटो, व्हिडिओ अन् माहिती ते इन्स्टावरून लोकांना देत असतात.

Narendra Modi Instagram followers milestone
Dombivli Crime : १० बिअर, ४५ झोपेच्या गोळ्या; डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, नर्स ठरली कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com