

Bhuabhilekh online application process : सातबारा उताऱ्यातील पोटहिश्श्यातील जागा जमिनीवरून अनेकदा रक्ताच्या नात्यातही वाद होतात. टोकाच्या वादानंतर पोलिसांच्या मदत घेऊन जमीनीची मोजणी केली जाते. यासाठी अनेकदा अतिरिक्त पैसे मोजावे लागतातच, त्याशिवाय जास्तचा वेळही जातो. पण आता यावर सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे. पोटहिश्श्याची मोजणी कऱण्यासाठी आता फक्त ९० दिवसांचा काळ आणि २०० रूपयांचा खर्च होणार आहे. त्यासाठी ‘भूमिअभिलेख’च्या ऑनलाइन अर्ज करावा लागेल. पाहूयात हे नेमकं काय प्रकरण आहे.
बांध पोखरणे, अतिक्रमणावरून अनेकदा रक्ताच्या नात्यात अथवा शेजाऱ्यांविरोधात टोकाची भांडणे होतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे दररोज २०० ते ३०० अर्ज येत असतात. काही जिल्ह्यांमध्ये ही संख्या कमीजास्त असू शकते. पण राज्यात पोटहिश्श्याच्या जमिनीसाठी दररोज वाद होतात. यावर आता सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना पोटहिश्शाची मोजणी फक्त २०० रुपयांत मिळणार आहे. त्यासाठी फक्त ९० दिवसांत ही मोजण पूर्ण होईल, असे सरकारकडून अधिकृत सांगण्यात आले आहे. पण काही भूमिअभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यास याला थोडा विलंब लागू शकतो. सरकारच्या नव्या जीआरनुसार, या निर्णयानुसार ऑनलाइन अर्ज केलेल्यांना नियमित मोजणीच्या निकषांनुसार फक्त ९० दिवसांत त्या क्षेत्रांची मोजणी करून मिळेल.
एकाच सातबारा उताऱ्यावर कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे असणे ही बाब आता वादाचे कारण ठरणार नाही. सहसा, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच सातबारा उताऱ्यावर असतात. कोणाच्या वाट्याला किती क्षेत्र आहे याची नोंदही असते. पण जमिनीची नेमकी दिशा आणि हद्द (Boundary) स्पष्ट नसते. यामुळे प्रत्यक्षात जमिनीचा वापर करताना अनेकदा वाद उद्भवतात. हे कौटुंबिक कलह टाळण्यासाठी महसूल विभागाने आता फक्त २०० रुपये शुल्कात 'पोटहिस्सा मोजणी' करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक हिस्सेदाराला आपली जमीन नेमकी कुठे आहे, हे समजणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.