Nawanath Ban Padalkar and Mahadik new role in BJP explained : भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज राज्यातील नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. आगामी निवडणुका आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊन विचारपूर्वक ही टीम निवडण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये अनुभवी नेत्यांसोबतच सुजय विखे पाटील, भारती पवार आणि कृष्णराज महाडिक यांसारख्या आक्रमक आणि तरुण चेहऱ्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर नवनाथ बन यांना बढती मिळाली आहे, तर पडळकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. (BJP leaders list Maharashtra)
कार्यकारिणी जाहीर करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही घोषणा प्रलंबित होती. अमित शाह, नितीन नबीन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही नावे निश्चित करण्यात आली आहेत. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असली तरी, घटनात्मक मर्यादांमुळे सर्वांनाच पद देणे शक्य नसते. मात्र, ज्यांना या यादीत स्थान मिळालेले नाही, त्यांना आगामी काळात इतर आघाड्यांमधून कामाची संधी दिली जाईल.
अतुल काळसेकर - कोकण
भारती पवार - उत्तर महाराष्ट्र
संजय कौडगे - मराठवाडा
संजय भेंडे - विदर्भ
रामदास तडस - विदर्भ
केशव उपाध्ये - मुंबई
प्रवीन पोटे - विदर्भ
गोपीचंद पडळकर - पश्चिम महाराष्ट्र
चैतन्यबापू देशमुख - मराठवाडा
प्रिया शिंदे - पश्चिम महाराष्ट्र
सुजय विखे - उत्तर महाराष्ट्र
अर्चना पाटील चाकुरकर - मराठवाडा
निरंजन डावखरे - कोकण
योगेश सागर- मुंबई
संजय कूटे - विदर्भ
माधवी नाईक -कोकण
राजेश पांडे - पश्चिम महाराष्ट्र
सुनील राणे - मुंबई
प्रशांत ठाकुर - कोकण
मंगेश चव्हाण - उत्तर महाराष्ट्र
परिणय फुके - विदर्भ
वर्षा ढहाळे - पश्चिम महाराष्ट्र
संतोष जनाटे - कोकण
संजय जगताप - पश्चिम महाराष्ट्र
अर्चना डेहनकर -विदर्भ
रोहिणी नायडू - उत्तर महाराष्ट्र
राम सातपुते - पश्चिम महाराष्ट्र
प्रवीण घुगे - मराठवाडा
रेखा कुलकर्णी - मराठवाडा
भैरवी वाघ - उत्तर महाराष्ट्र
मिहीर कोटेचा - कोषाध्यक्ष - मुंबई
अरुण लखानी- सह कोषाध्यक्ष - विदर्भ
रविंद्र अनासपुरे - मुख्यालय प्रभारी - पश्चिम महाराष्ट्र
विश्वास पाठक - मुख्यालय सह प्रभारी - मुंबई
नवनाथ बन - मुख्य प्रवक्ता - मुंबई
कृष्णराज महाडिक - युवा मोर्चा अध्यक्ष - पश्चिम महाराष्ट्र
चित्रा वाघ - महिला मोर्चा अध्यक्षा - मुंबई
रामकृष्ण वेताळ - किसान मोर्चा अध्यक्ष - पश्चिम महाराष्ट्र
योगेश टिळेकर - ओ.बी.सी मोर्चा अध्यक्ष - पश्चिम महाराष्ट्र
विश्वजित गायकवाड - एस.सी मोर्चा अध्यक्ष - मराठवाडा
देवराव होळी - एस.टी मोर्चा अध्यक्ष - विदर्भ
नरेंद्र पवार - भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष - कोकण
इद्रिस मुलतानी - अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष - मराठवाडा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.