Uttar Pradesh latest news
Uttar Pradesh latest news साम टीव्ही मराठी

हृदयद्रावक! बाप नमाजसाठी बाहेर गेला अन् घरात काळाने घातला घाला; ५ मुलांसह ६ जण जिवंत जळाले

Uttar Pradesh latest news : मेरठमध्ये घराला लागलेल्या भीषण आगीत पाच मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळती हे प्राथमिक कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on

Meerut fire Death Toll Update : उत्तर प्रदेशामधील मेरठमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरातील कर्ता पुरुष नमाजासाठी घरातून बाहेर गेला. त्याचवेळी काळाने घाला घातला अन् घराला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. मृतामध्ये जुडवा मुलींसह ५ चिमुकल्यांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नमाज पडून घरी परतलेल्या पित्याला समोर आपल्या कुटुंबाची झालेला शेवट पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांच्या आक्रोशाने घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. या घटनेमुळे संपूर्ण मेरठ शहरात शोककळा पसरली

सोमवारी रात्री मेरठ जिल्ह्यातील एका निवासी घरात लागलेल्या आगीत पाच मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. जेव्हा आग आटोक्यात आली, पण घरात अडकलेले सहा जण गंभीर भाजले गेले होते. त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी ६ जणांचा मृत्यू झाला.

Uttar Pradesh latest news
BJP : नवनाथ बन यांना भाजपमध्ये बढती, पडळकर-महाडिकांना मोठी संधी, वाचा कुणाला मिळाली कोणती पदे?

सोमवारी संध्याकाळी घरातील कर्ता व्यक्ती इकबाल हा भावासोबत नमाजासाठी घराबाहेर गेला होता. त्याचवेळी दुमजली इमारतीला भयंकर आग लागली. घरात २ महिला आणि ५ मुले होते. आगीचा भडका इतका वाढला की कुणालाच घराबाहेर पडता आळे नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीचा तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम होते. वरच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल. कपड्यांमुळे आग झपाट्याने वाढली. यामध्ये कुटुंबातील सहा जण जिवंत जळाले.

Uttar Pradesh latest news
Pune : पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा अचानक छापा, खिडकीतून तरूणीची उडी, जागेवरच मृत्यू

प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून अद्याप अधिकृत कारणाची पुष्टी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला. स्थानिकांनी सांगितले की, सायंकाळच्या वेळी घरातून आग आणि धुराचे लोळ आलेले दिसले. त्यानंतर पोलिासांना पाचारण करण्यात आले. पण तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

Uttar Pradesh latest news
Air Ambulance Crash : एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू; कुठे घडली दुर्घटना?

आगीवर नियंत्रण मिळवण्याआधी अग्निशमन दलाला तेथील अरूंद गल्ल्यातून घटनास्थळाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागली. अग्निशमन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा होता. तिथल्या गल्ल्या अत्यंत अरुंद असल्याने गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागले. त्यामुळे आग विझवण्यास उशीर झाला. लवकर आगीवर नियंत्रण मिळवता आले असते तर ६ जणांचा जीव वाचला असता. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक पाहणीनंतर शॉर्ट सर्किट किंवा गॅस सिलेंडरची गळती यापैकी एका कारण असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Uttar Pradesh latest news
महाराष्ट्रातील गर्भाशयातील बिजांड विक्रीच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश? धागेदोरे थेट बंगळुरू-तेलंगणात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com