Pune : पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा अचानक छापा, खिडकीतून तरूणीची उडी, जागेवरच मृत्यू

Pune spa raid : पुण्यातील विमाननगर परिसरात स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात घाबरलेल्या तरुणीने खिडकीतून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तपास सुरू आहे.
Crime News
Spa Centre NewsSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

woman dies after jumping during spa raid in Pune : पुण्यातील विमाननगर परिसरातील स्पा सेंटरवर पोलिसांनी अचानक धाड टाकली. पोलिसांनी दरवाजा ठोठावल्यानंतर स्पा सेंटरमधील (spa centre police raids pune) घाबरलेल्या तरूणीने थेट खिडकीतून खाली उडी मारली. जमिनीवर पडल्यानंतर तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अन् जागेवरच मृत्यू झाला. तर स्पा सेंटरचा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला. संकिता मुखर्जी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर विमाननगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खिडकीतून उडी मारल्याने तरुणीचा मृत्यू

विमाननगर परिसरात असणाऱ्या एका नामांकीत स्पा सेंटरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत घाबरलेल्या तरुणीने इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला. तर स्पाचा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना विमाननगरमधील सिटी स्पेस इमारतीच्या परिसरात घडली.

Crime News
महाराष्ट्रातील गर्भाशयातील बिजांड विक्रीच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश? धागेदोरे थेट बंगळुरू-तेलंगणात

नेमकं काय झालं होतं?

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलिसांनी सोमवारी दुपारी ३ वाजता सिटी स्पेस इमारतीच्या परिसरातील स्पा सेंटरवर अचानक छापा मारला. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावल्यानंतर स्पा सेंटरमधील घाबरलेल्या तरुणीसह व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला. तर, व्यवस्थापकाच्या पायाला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या कारवाईत इतर चार तरुणींची सुटका करण्यात आली.

Crime News
War Fears : इराण सोडा! भारतीयांना मोदी सरकारने का दिले आदेश? नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांवर गंभीर आरोप, पण खरं काय ?

दरम्यान, या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी सुमारे २० मिनिटे केवळ फेऱ्या मारत होते. त्यांनी जखमींना रुग्णवाहिका किंवा पोलिसांच्या गाडीतून तत्काळ रुग्णालयात दाखल केले नाही. काही वेळानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केला आहे. मात्र, जखमी झालेल्या तरुण-तरुणीला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Crime News
Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com