War Fears : इराण सोडा! भारतीयांना मोदी सरकारने का दिले आदेश? नेमकं काय आहे प्रकरण?

Iran US conflict : अमेरिका-इराण तणाव तीव्र होत असताना भारतीय दूतावासाने इराणमधील नागरिकांना तातडीची सुरक्षा सूचना दिली आहे. ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर परिस्थिती गंभीर बनली असून भारतीयांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Saam TV Marathi News
Tehran situation updatesSaam TV Marathi
Published On

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम दिल्यानंतर भारतीय दुतावासाने भारतीयांना काय आवाहन केलंय... या सगळ्या घडामोडींमुळे तिसऱ्या महायुद्धाला कसं तोंड फुटणार, पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट

Saam TV Marathi News
Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आता 10 ते 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे मात्र इराणमधल्या भारतीयांचं टेंशन वाढलंय. तेहरानमधील भारतीय दूतावासानं भारतीयांना इराण सोडण्याचं आवाहन केलंय. इराणमध्ये सध्या जोरदार निदर्शनं सुरू आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित झालीय...त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी भारतीयांना नेमकी काय काळजी घेण्याचं आवाहन केलंय ते पाहूयात....

युद्धाचा भडका, भारतीयांनो इराण सोडा

इराणमधील भारतीयांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेणं टाळावं

उपलब्ध मार्गांचा वापर करून इराण सोडा

आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा

आपापली ओळखपत्रे तयार ठेवा

Saam TV Marathi News
कोणत्याही परिस्थितीत इराण सोडा! मोदी सरकारचा भारतीय नागरिकांना इशारा; काय आहे अमेरिकेचा प्लॅन?

अमेरिकेनं ज्या पद्धतीनं लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत ते पाहता इराणवर कधीही क्षेपणास्त्रांचा हल्ला होऊ शकतो.त्यामुळेच केंद्र सरकार भारतीयांना सुरक्षेबाबत सूचना जारी केल्या आहेत...भारत दोन्ही देशांशी संवाद साधून शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र युद्धाचा धोका टाळण्यासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं पावलं टाकायला सुरूवात केलीय. ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर इराण-अमेरिकेत युद्ध भडकलं तर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे...

Saam TV Marathi News
Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा गॅस टँकरचा अपघात, ब्रेक फेल झालं अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com