पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! प्रवासाचा वेळ वाचणार, या दिवशी सुरू होणार लोकल, कोणती असतील स्थानकं?

Panvel railway station route map : पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडोरचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. स्थानकं, प्रकल्प खर्च आणि संभाव्य सुरूवातीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Panvel-Karjat Local: पनवेल-कर्जत लोकल कधीपर्यंत सुरू होणार? प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?
Panvel-Karjat LocalSaam Tv
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Panvel Karjat Local Train Update : पनवेल ते कर्जत दरम्यान रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पनवेल–कर्जत रेल्वे कॉरिडोरचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प चालू वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे. सुमारे २,७८२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना मानला जात आहे.(Panvel Karjat local train project update)

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कॉरिडोरची एकूण लांबी २९.६ किलोमीटर आहे. दुहेरी मार्गिकेच्या (डबल लाईन) ट्रॅकपैकी सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पनवेल ते कर्जत दरम्यानचे दोन रेल्वे फ्लायओव्हर पूर्ण झाले असून तीन बोगद्यांचे (टनल) बांधकाम करण्यात आले आहे. या बोगद्यांची एकूण लांबी सुमारे ३.२ किलोमीटर असून त्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च झाला आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे २,७८२ कोटी रुपये आहे. २९ किलोमीटर मार्गावर ५ रोड ओव्हर ब्रिज आणि १५ रोड अंडर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल, चिखले, पोंयेन्जे, चौक आणि कर्जत ही सुरूवातीची स्थानके असून त्यांचे कामही प्रगती पथावर आहे.

Panvel-Karjat Local: पनवेल-कर्जत लोकल कधीपर्यंत सुरू होणार? प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?
Supriya Sule : सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

हा कॉरिडोर सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत प्रवासाचा वेळ सध्याच्या कल्याण मार्गावरील रेल्वे लाईनच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. पनवेल स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना थेट एस्केलेटरद्वारे कर्जत मार्गावर जाता येईल. या मार्गामुळे नवी मुंबई व पनवेल परिसरात कामासाठी ये-जा करणाऱ्या कर्जत परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सध्या रस्तेमार्गे कर्जत गाठण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो, तर नव्या रेल्वेमार्गामुळे हा प्रवास सुमारे ४० मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Panvel-Karjat Local: पनवेल-कर्जत लोकल कधीपर्यंत सुरू होणार? प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?
कामाची बातमी! फक्त ₹२०० मध्ये सातबारा उतार्‍यावरील पोटहिश्शाची मोजणी, ९० दिवसात मोजणी; कोणत्या वेबसाईटवर कराल अर्ज?

प्रकल्पाचे मुख्य अभियंता योगेश शर्मा यांनी सांगितले की, हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. भौगोलिक व तांत्रिक अडचणींवर मात करताना विशेषतः किरावली बोगद्याच्या खोदकामासाठी सखोल भू-वैज्ञानिक अभ्यास, नियंत्रित स्फोट तंत्र आणि अस्थिर खडकातून सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी मजबूत आधाररचना उभारावी लागली. पनवेल आणि कर्जत येथे रेल्वे फ्लायओव्हर उभारणे तसेच रेल्वे सेवा सुरू ठेवत यार्डमध्ये बदल करणे हे मोठे आव्हान होते. अत्यंत सूक्ष्म नियोजन, आधुनिक सिग्नलिंग प्रणाली आणि मध्य रेल्वेसोबत समन्वय साधत हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

Panvel-Karjat Local: पनवेल-कर्जत लोकल कधीपर्यंत सुरू होणार? प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?
कसाई बाप! नराधम बापानेच मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले; नवी मुंबई हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com