विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
Navi Mumbai father forces daughters into prostitution case : नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापानेच पोटच्या २ अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याची संतापजनक घटना समोर आले आहे. नवी मुंबईत रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही धक्कादायक घटना उघड झाली. नवी मुंबई पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका केली असून दलालाला बेड्या ठोकल्या आहेत. तर आरोपी बापाचा शोध घेतला जात आहे.
नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं आहे. एका दलालामार्फत तो आपल्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली. पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे. आरोपी पित्याचा शोध घेतला जात आहे.
नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी केली. तेव्हा १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता यामागे याच मुलींचा नराधम बाप असल्याचं उघड झालं अन् पायाखालची जमीन सरकली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहणारा हा नराधम पिता आपल्याच मुलींचा सौदा करत होता. याप्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिसांकडून फरार बापाचा कसून शोध घेतला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी पथके तयार केली असून आरोपी बापाचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.