Pune News : नगरच्या व्यक्तीचा सिंहगड किल्ल्यावर मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?

Pune Sinhagad Fort News : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह कल्याण दरवाजाच्या येथील दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास सुरू आहे.
Pune News : नगरच्या व्यक्तीचा सिंहगड किल्ल्यावर मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?
Pune Sinhagad Fort NewsSaam Tv
Published On
Summary
  • सिंहगड किल्ल्यावर काम करणाऱ्या मजुराचा दरीत मृतदेह आढळला

  • मृत मजूर चार दिवसांपूर्वी कामासाठी किल्ल्यावर आले होते

  • पर्यटकांना मृतदेह दिसल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचावकार्य केले

  • पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला

सचिन जाधव, पुणे

Pune Sinhagad Kalyan Darwaja Worker Death Body found पुणे सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधिस्थळावर ठेकदाराकडे काम करणाऱ्या मजुराचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या दरीत आढळला. दशरथ शंकर धोत्रे असे ह्या मृत मजूराच नाव आहे. ते मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत धोत्रे हे चार दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. धोत्रे हे त्यांच्या इतर ४-५ साथीदारांसोबत सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे समाधी परिसरातील पुरातत्व विभागाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करीत होते. कामानिमित्त धोत्रे आणि त्यांचे सहकारी मित्र हे सिंहगड किल्ल्यावरच वास्तव्यास होते.

Pune News : नगरच्या व्यक्तीचा सिंहगड किल्ल्यावर मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?
Dombivli : डोंबिवलीतील 'त्या' विद्यार्थिनीच्या खात्यात २ कोटी ६० हजार; उल्हासनगर ते उत्तराखंड कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

दरम्यान दशरथ धोत्रे हे बुधवारी मध्यरात्रीपासून गायब होते. त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले की, ते गावाकडे निघून गेले असतील. दिवसभर त्यांचा फोनही झाला नाही. मात्र, इकडे कल्याण दरवाजा परिसरात सायंकाळच्या सुमारास पर्यटकांना मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली आहे.

Pune News : नगरच्या व्यक्तीचा सिंहगड किल्ल्यावर मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?
Kalyan Dombivli : केडीएमसीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत;महापौर, उपमहापौर बिनविरोध, तरीही महासभा का नाही? कुणाचा दबाव?

या घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडावर धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढला. स्थानिक राजगड पोलिसांकडे सुपूर्त केला. दरम्यान हा अपघाती मृत्यू आहे की घातपात हे अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलीस खोल तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com