पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Pune Accident Video: पुण्यात ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Pune Accident VideoSaam Tv
Published On
  • पुण्यातील पाबळ येथे ३ वाहनांचा विचित्र

  • भरधाव कारने टेम्पो आणि दुचाकीला धडक दिली

  • अपघातात एकाचा जागीच मृत्यू

  • अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे

रोहिदास गाडगे, पुणे

पुण्यामध्ये ३ वाहनांचा विचित्र अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शिरूर तालुक्यातील पाबळ येथे झाला. भरधाव कारने आधी छोट्या टेम्पोला नंतर दुचाकीला धडक दिली. हा भीषण अपघात रस्त्याच्या कडेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील पाबळ रस्त्यावर कारने ओव्हरटेक करताना टेम्पो आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये टेम्पोमध्ये असलेली एक महिला आणि एक पुरूष दूरवर फेकले गेले. तर दुचाकीवरून जाणारी व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. अपघातामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले होते. यामधील एकाचा मृत्यू झाला. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Magic Van Accident : मॅजिक व्हॅनची ट्रकला भीषण धडक, ९ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

या अपघाताचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक भरधाव वेगात पांढऱ्या रंगाची कार येत आहे. ही कार विरुद्ध दिशेने जात आहे. या कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, टेम्पोमध्ये बसलेली महिला आणि पुरूष काचा फुटून रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. त्यानंतर या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

या अपघातात सुदैवाने बचावलेला दुचाकीस्वार स्वतःच्या पायावर उभा राहतो. रागाच्या भरात तो रस्त्यावरील एक लाकडी दांडका हातात घेतो आणि कारचालकाला अद्दल घडवण्यासाठी संतापाने कारकडे चालत येतो. कारजवळ पोहोचून तो जाब विचारणार तितक्यात त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे पडते. टेम्पोतील दोघे गंभीर अवस्थेत रस्त्यावर निपचित पडलेले त्याला दिसतात.

अपघाताची ती भीषणता पाहून त्याचा राग क्षणार्धात शांत होतो आणि तो हातातला दांडका खाली टाकतो. हा व्हिडीओ केवळ एका अपघाताचा नाही तर मानवी भावनांच्या गुंतागुंतीचा आणि रस्त्यावरील एका छोट्याशा चुकीच्या भयंकर परिणामांचा जिवंत पुरावा आहे. वाहन चालवताना संयम बाळगा, कारण तुमची चूक दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकते इतकंच.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com