Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

Kalyan- Ahilyanagar Highway Accident: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर अपघाताची थरारक घटना घडली. भरधाव वाहनाच्या धडकेत बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं
Pune AccidentSaam Tv
Published On
  • पुण्यातील जुन्नरमध्ये भीषण अपघात

  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील घटना

  • भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली

  • फादर्स डेच्या दिवशी बापलेकीचा मृत्यू

रोहिदास गाडगे, जुन्नर

पुण्यातील जुन्नरमध्ये कल्याण - आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. फादर्स डेच्या दिवशी बाप- लेकीवर काळाने घाला घातला. भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. उदापूर येथे हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे ही अपघाताची घटना घडली. भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. चाकाखाली चिरडून बाप-लेकीने जागीच प्राण सोडले. या भीषण अपघाताने फादर्स डेच्या दिवशीच एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला. वडिलांच्या प्रेमाचा गौरव करणाऱ्या फादर्स डेच्या दिवशी नियतीने बाप-लेकींचा अंत केल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं
Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

आनंद आणि उत्सवाचा दिवस या कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दोघांच्याही शरीराचे तुकडे झाले होते. महामार्गावरील हे चित्र पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. मात्र फादर्स डेच्या दिवशीच काळाने बाप-लेकींचा घात केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

बीडच्या परळी शहरात भयंकर अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यामध्ये स्पष्टपणे दिसत होते कारने दुचाकी स्वराला भरधाव वेगाने उडवले आणि मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढलेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. प्रशांत देशमुख असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते.

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं
MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com