MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

MLA Anant Singh Convoy Accident: मोकामाचे जेडीयू (JDU) आमदार अनंत सिंह यांच्या ताफ्यातील पाच वाहने अचानक एकमेकांवर आदळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र वाहनांचे नुकसान झाले.
MLA Anant Singh Convoy Accident
MLA Anant Singh Convoy Accidentsaam tv
Published On
Summary
  • बिहारमध्ये जेडीयू आमदार अनंत सिंह यांच्या ताफ्यातील पाच वाहनांचा भीषण अपघात झाला.

  • सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • अपघातात ताफ्यातील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बिहारमधील मोकामा येथील जेडी(यू) आमदार अनंत सिंह एका मोठ्या रस्ते अपघातातून थोडक्यात बचावले. बारह उपविभागांतर्गत येणाऱ्या अथमलगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सबनिमा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताफ्यातील अनेक वाहनांचा अपघात झाला. ताफ्यातील पाच वाहने एकमेकांवर आदळली. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी गोंधळ उडाला. मात्र या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

MLA Anant Singh Convoy Accident
Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मोकामा विधानसभा मतदारसंघातील बडपूर गावात एका विवाह समारंभासाठी अनंत सिंह गेले होते. आमदार अनंत सिंह यांच्या ताफ्यात सुमारे १५ वाहने होते. आमदार ताफ्यासह पाटण्याला परतत होते, त्यावेळी आमदारांची गाडी सर्वात पुढे होती. रस्त्याच्या कडेला अनेक ट्रक लाइनमध्ये उभे होते. आमदारांची गाडी सुरळीतपणे तेथून निघून गेली. परंतु त्यांच्या कार मागे चालणाऱ्या कार चालकाचा गाडीवर ताबा सुटला आणि कार उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.

MLA Anant Singh Convoy Accident
Accident News : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून केली पाहणी

पाच वाहनांची जोरदार धडक

दुसरे वाहन ट्रकला धडकले आणि त्याच्या मागे असलेली इतर चार वाहनेही एकमेकांवर आदळली. अपघातानंतर रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांची गर्दी जमली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच आमदार अनंत सिंह यांनी आपली गाडी त्वरित थांबवली आणि ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताफ्यातील लोकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही ना, याची खात्री केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी सुमारे पाच मिनिटे थांबल्यानंतर, ते आपल्या प्रवासाला पुढे निघाले. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे, परंतु जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com