

पुणे शहरातील अनेक भागांत आज वीज पुरवठा बंद राहणार
सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत लाईट बंद राहणार
महावितरणकडून देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू
नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती गुल होणार आहे. पुणे शहरातील अनेक भागांना याचा फटका बसणार आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आज पुणेकरांना काही तास अंधारात राहावे लागणार आहे. महावितरण कंपनीने पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महावितरण कंपनीकडून देखभाल आणि दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पुणे शहरातील बहुतांश परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. पुणे शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने याबाबत परिपत्रक देखील जारी केले आहे. वीज पुरवठा बंद काळामध्ये पुण्यातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि महावितरणाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार भवन, फाटकबाग सोसायटी, सेनादत्त पोलिस चौकी, श्री सईनगर, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर, गांजवे चौक, न्यू इंग्लिश स्कूल, रामबाग कॉलनी, सदाशिवपेठ, कुमठेकर रोड, पेरूगेट, वाडिया हॉस्पिटल, शुक्रवारपेठ, बुधवारपेठ, फरासखाना, जोगेश्वरी, लक्ष्मी रोड, श्रीनाथ थिएटर, बाजीराव रोड आणि लगतचा परसिर, टिळक रोड, टेलिफोन एक्सचेंज, चिमण्या बाग, एस.पी. कॉलेज, फुले मंडई, सुयश हॉटेल आणि लगतचा परिसर याठिकाणी वीज पुरवठा खंडीत राहिल.
हत्ती गणपती, भरतनाट्यम मंदिर, भारती विद्यापीठ भवन, वैकुंठ स्मशानभूमी, नवीपेठ, पुना हॉस्पिटल, जेएसपीएम कॉलेज, झिल कॉलेज, नऱ्हेगाव, भूमकर चौक, अभिनव कॉलेज, स्वामीनारायण मंदिर, पारि कंपनी चौक, अष्टविनायक इंडस्ट्रियल एरिया, धायरी आणि लगतचा परिसर, शुक्रवार पेठ, भाजी मंडई, बदामी हौद, कला हौद चौक, प्रेस्टिंज पॉईट, चिंचेची तालिम, सेवा मित्र मंडळ चौक, मधुकर हॉस्पिटल जवळील भाग याठिकाणी देखील बत्तीगुल राहिल.
तंसच, धनलक्ष्मी महालक्ष्मी सोसायटी, एकता नगरी, आनंदनगर, संतोष हॉल चौक, जनता वसाहत गल्ली गल्ली नं. ५० ते गल्ली नं. १०९, १२२ चुना भट्टी, शंकर मंदिर आणि लगतचा परिसर, राम मंदिर आणि लगतचा परिसर, वाघजाई मंदिर आणि लगतचा परिसर याठिकाणी आज वीज पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.