Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

Pune–Mumbai Expressway Traffic Update : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाल्याने ३२ तास वाहतूक ठप्प होती. टँकर हटवल्यानंतर आता हळूहळू वाहतूक पूर्ववत होत आहे.

Pune Mumbai Expressway traffic restored after gas tanker accident : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूक तब्बल 32 तासांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर पलटी झालेल्या गॅस टँकरमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाने आणि आपत्कालीन यंत्रणांनी चार क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करून मार्ग मोकळा केलाय. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी तासन् तास अडकून पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. टँकर हटवल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली. सध्या वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असून वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलंय.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता एका गॅस टँकरचा अपघात होऊन तो महामार्गावर उलटला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती. टँकरमधील गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने अत्यंत खबरदारी घेतली होती. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टँकर हटवल्यानंतर पोलिसांनी तातडीने रस्ता मोकळा केला असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष व्यवस्था तैनात केली. सध्या या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com