Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले, CNG पंपावरील व्हिडिओ व्हायरल

Shehzad Poonawalla mother accident Pune : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला पुण्यातील सीएनजी पंपावर कारने जाणूनबुजून उडवण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून आरोपी फरार आहे. पूनावाला यांनी तात्काळ अटकेची मागणी केली आहे.
Pune hit and run CNG pump CCTV
Pune hit and run CNG pump CCTV
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune hit and run CNG pump CCTV : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने उडवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सीएनजी पंपावर हा प्रकार घडलाय. कार चालकाने जाणूनबुजून शहजाद पूनावाला यांच्या आईला उडवले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अपघातामध्ये शहजाद पूनावाला यांच्या आईला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शहजाद पूनावाला यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आई सीएनजी पंपावर कारची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका कारने त्यांना जोरात उडवले. यानंतर कारचालक फरार झाला आहे पुण्यातील एका सीएनजी पंपावर हा सगळा प्रकार रात्री घडला आहे. पोलिसाने या कार चालकाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी शहजाद पूनावाला यांनी केली आहे. या अपघातात शहजाद पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये कार चालकाने जाणूनबुजून शहजाद पूनावाला यांच्या आईला धक्का मारल्याचे दिसत आहे.

शहजाद पूनावाला यांनी आईच्या अपघाताची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. भाजप नेत्याने आरोपींना अटक करण्याची आणि योग्य शिक्षा देण्याची मागणी केली. शहजाद पूनावाला यांनी लिहिले, "एका माणसाने माझ्या आईला जाणूनबुजून धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आरोपी तिला धडक देऊन पळून गेला. माझ्या आईला लवकरच शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. या वयात तिच्यासोबत असे घडणे खूप त्रासदायक आहे. मला आशा आहे की पुणे पोलिस त्या माणसाला अटक करतील आणि त्याला योग्य शिक्षा मिळेल."

Pune hit and run CNG pump CCTV
NCP : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन, राष्ट्रवादीवर शोककळा
Pune hit and run CNG pump CCTV
Beed News : धक्कादायक! सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आक्रित घडलं, धावत्या कारने घेतला पेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com