NCP : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन, राष्ट्रवादीवर शोककळा

Ravindra Pagare death news : अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
District President Adv. Ravindra Pagare
District President Adv. Ravindra PagareSaam TV Marathi
Published On

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

NCP Nashik district president latest news : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पांडुरंग पगारे यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. २०१२ पासून ते नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अजित पवार यांचे नाशिकमधील विश्वासू म्हणून त्यांची उत्तर महाराष्ट्रात ओळख होती. मंगळवारी रात्री पगारे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्यात पोकळी निर्माण झाली आहे. ऐन जिल्हा परिषद निवडणुका सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा निशिकमधील जिल्हाअध्यक्षांचे निधन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पांडुरंग पगारे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज बुधवारी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे होणार आहे. २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय अशी पगारे यांची ओळख राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पगारे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. १९९९ मध्ये पगारे हे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रावादी काँग्रेससोबत आले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादीचं काम करत राहिलेत.

District President Adv. Ravindra Pagare
Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

रवींद्र पगारे यांनी नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून काम केले होते. संघटनात्मक कामकाजाचा ४० वर्षांचा अनुभव असलेल्या अ‍ॅड. पगारे यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस आणि एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले होते. याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९९९ मध्ये शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. यानंतर राज्यात सर्वप्रथम पगारे यांनी नाशिक येथील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनार्थ मेळावा घेतला होता. पगारे यांच्या निधनानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

District President Adv. Ravindra Pagare
Ajit Pawar Death : दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com