Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

Ajit Pawar last phone call audio : विमान अपघात होण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी अजित पवार यांनी कार्यकर्त्याशी फोनवर संवाद साधला होता. त्यांच्या शेवटच्या फोन कॉलमधील शब्द आणि नेमकं काय बोलणं झालं, वाचा
Ajit Pawar Death
Ajit Pawar deathsaamtv
Published On

Ajit Pawar Last Phone Call Before Plane Crash Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवार यांचं विमानाचा अपघात होण्याआधी १० मिनिटे आधी त्यांनी एका कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या जागावाटपावर तक्रार केली होती. त्यांना दादांना तात्काळ फोन करत गैरसमज दूर केला होता. या दोघांमधील संवाद समोर आलाय. श्रीजीत पवार यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी दादांचा फोनकॉलही ऐकवला. विमान लँड होत असताना अजित पवार यांनी मला फोन केला होता, असे श्रीजीत पवार यांनी सांगितले. त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे.. ते पाहूयात...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पावनेदहा वाजताच्या आसपास विमान अपघात झाला. त्याआधी १० मिनिटे श्रीजीत पवार यांनी त्यांना मेसेज केला होता. अपघात होण्याआधी अजित पवार यांनी फोन करत त्यांचा गैरसमज दूर केला. अपघाताच्या आधी १० मिनिट विमानातून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. 8 वाजून ३७ मिनिटांनी अजित पवार यांनी शेवटचं फोनवर बोलणं झालं होतं. एक मिनिट फोन कॉल झाला होता, अशी माहिती त्यांनी केली. सर्वजाती धर्मांना सोबत घेऊन पुढे जाऊयात, असा त्यांचा शेवटचा संवाद होता.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death : दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

श्रीजीत पवार हे अजित पवार यांचा चुलत पुतण्या आहे. अडचण आल्यानंतर मी त्यांना मेसेज टाकतो. ते वेळ मिळाल्यानंतर लगेच फोन करतात. जिल्हा परिषद निवडणुकीत तिकिट वाटपावरून मला गैरसमज झाला होता. त्यामुळे मी त्यांना मेसेज केला होता. त्यावर त्यांनी मला विमान लँड होत असताना फोन केला होता, असे श्रीजीत पवार म्हणाले. सर्वजाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा दादांचा प्रयत्न होता.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नवे तर 'या' गोष्टीमुळे पटली, तपासात मोठा खुलासा

शेवटच्या फोन कॉलमध्ये दादा नेमकं काय म्हणाले ?

अजित पवार - तुम्हाला काही माहिती नसते, काहीतरी बोलता. आपण सर्वजाती धर्मांना सोबत घेऊन जातो बाळा. आपण सर्व एकत्र राहतो. सर्वांना न्याय देण्याचं काम करू.

माळी समजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी आपण दिली आहे. ओबीसीचे आरक्षण होते, बाकीच्यांनी दिले नाही. आपण दिले. इतर पक्षाने दुसऱ्याला उमेदवारी दिली. पण आपण व्यवस्थित केलेय.

Ajit Pawar Death
Today Gold Rate : सोनं प्रति तोळा ₹९८०० नी झालं स्वस्त, तर चांदीत ५३ हजारांची घट; वाचा सुवर्णनगरीतील 22k, 24k चे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com