Ajit Pawar Death : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नवे तर 'या' गोष्टीमुळे पटली, तपासात मोठा खुलासा

Baramati aircraft crash investigation latest update : बारामती विमान अपघातानंतर अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांच्या कुर्त्याच्या कापडामुळे पटल्याचा मोठा खुलासा तपासात झाला आहे. खात्रीसाठी डीएनए चाचणी करण्यात आली.
Ajit Pawar Death
Ajit Pawar deathsaamtv
Published On

Ajit Pawar identification after Baramati plane crash : बारामतीमधील विमान अपघाताच्या घटनेनंतर अजित पवार यांची ओळख नेमकी कशी पटली, याबाबत आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळामुळे पटली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता वेगळीच माहिती समोर येत आहे. (Ajit Pawar identified by kurta fabric not watch)

विमान अमघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापड्यामुळे पटल्याचं समोर आलंय... त्याच्या डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा भाग कुर्त्याचा होता असं समजतंय. याआधी अजित पवारांची ओळख हातातील घड्याळावरुन पटल्याचं बोललं जात होतं, पण त्यांचं घड्याळ अद्याप सापडलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या हातावरील कुर्त्याच्या (शर्टच्या) कापडामुळे त्यांची प्रथम दर्शनी ओळख पटली. प्रत्यक्षात त्यांच्या डाव्या हातावर जे घड्याळासारखे दिसत होते, तो त्यांच्या शर्टचाच एक भाग होता. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूनंतर आतापर्यंत अजित पवारांचे घड्याळ पडलेले नाही. केवळ कापडावरून झालेली ही ओळख प्राथमिक होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पूर्णपणे खात्री पटवण्यासाठी प्रशासनाकडून DNA चाचणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com