Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv

Today Gold Rate : सोनं प्रति तोळा ₹९८०० नी झालं स्वस्त, तर चांदीत ५३ हजारांची घट; वाचा सुवर्णनगरीतील 22k, 24k चे दर

Gold price drop in Jalgaon today : जळगाव सुवर्ण बाजारात सोनं प्रति तोळा ₹9,800 नी स्वस्त झालं असून चांदीच्या दरात तब्बल ₹53,000 ची घट झाली आहे. 22K व 24K सोन्याचे ताजे दर आणि चांदीचे भाव वाचा सविस्तर.
Published on

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Latest 22K and 24K gold rates in Jalgaon : जळगाव सुवर्ण बाजारात दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात घट होत आहे. सोमवारी (ता. २) चांदीत तब्बल ५३ हजारांची घट झाली, तर सोन्यात नऊ हजार ८०० रुपयांची घट झाली. गेल्या गुरुवारी (ता. २९) चांदीने भावाचा उच्चांक गाठला होता. 'जीएसटी'सह चांदी प्रतिकिलो चार लाखांवर पोहोचली होती, तर सोने (प्रतिदहा ग्रॅम) एक लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचले होते.

३० व ३१ जानेवारीला भावात वाढलेला उच्चांक खाली आला. रविवारी (ता. १) सोने-चांदीचे भाव स्थिर होते. सोमवारी चांदीत तब्बल ५३ हजार रुपयांची (प्रतिकिलो) घट झाली. शनिवारी (ता. ३१) चांदी तीन लाख तीन हजार रुपये 'विनाजीएसटी' होती. 'जीएसटी' सह तीन लाख १२ हजार ९०० (प्रतिकिलो) रुपयांवर पोचली.

Today Gold Rate
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव द्या, आमदाराने कारण सांगितले, मुख्यमंत्र्यांचे नाव घेत म्हणाले...

सोमवारी चांदीत ५३ हजारांची घट होऊन चांदी 'विनाजीएसटी' दोन लाख ५० हजारांवर पोहोचली. 'जीएसटी'सह चांदी दोन लाख ५७ हजारांवर पोहोचली.गेल्या शनिवारी (ता. ३१) सोन्याच्या भावात नऊ हजार २०० रुपयांची घट झाली होती. 'जीएसटी'सह सोने एक लाख ६३ हजार ५४० रुपयर्यावर (प्रतिदहा ग्रॅम) पोहोचले होते. सोमवारी सोन्यात नऊ हजार ८०० रुपयांची घट झाली. सोने 'विनाजीएसटी' एक लाख ४९ हजारांवर पोहोचले आहे. 'जीएसटी'सह सोने एक लाख ५३ हजार ४७० रुपयांवर पोहोचले आहे.

Today Gold Rate
Ajit Pawar Death : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नवे तर 'या' गोष्टीमुळे पटली, तपासात मोठा खुलासा

सोन्या-चांदीच्या मागील काही दिवसांतील भाव (सोने प्रतिदहा ग्रॅम.... चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी))

२४ जानेवारी .....सोनं एक लाख ४४ हजार ९००...... चांदी तीन लाख ४० हजार

२६ जानेवारी ..... सोनं एक लाख ६० हजार . चांदी तीन लाख ५० हजार

२७ जानेवारी ..... सोनं एक लाख ५९ हजार ३००...... चांदी तीन लाख ४५ हजार

२८ जानेवारी ..... सोनं एक लाख ६४ हजार चांदी तीन लाख ६८ हजार

२९ जानेवारी.....सोनं एक लाख ७७ हजार ७००...... चांदी तीन लाख ९२ हजार

३० जानेवारी .....सोनं एक लाख ६८ हजार चांदी तीन लाख ५० हजार

३१ जानेवारी सोनं एक लाख ५८ हजार ८००...... चांदी तीन लाख ३ हजार

२ फेब्रुवारी सोनं एक लाख ४९ हजार... चांदी २ लाख ५० हजार

Today Gold Rate
स्वप्न अधुरंच! डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, नागपूरमधील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com