

दूधानंतर आता पावाच्या किंमती वाढल्या
पाव-ब्रेड प्रति लादीमागे ५ रुपयांनी महागला
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
सर्वसामान्यांना अजून एक फटका बसला आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत त्यानंतर आता पावाच्या किंमती वाढल्या आहेत.पावाच्या किंमती ५ रुपयांनी वाढल्या आहेत. याआधीच दुधाच्या किंमती २ रुपयांनी वाढल्या आहे त्यानंतर आता पाव आणि ब्रेडच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटला चांगलाच धक्का बसणार आहे, याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
पावाच्या किंमती महागल्या (Pav Bread Price Increase)
आजपासून पावाच्या किंमती वाढल्या आहेत. ६ पावांच्या लादीमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे. आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च, पॅकेजिंक आणि वाहतुकीसाठीचा खर्च वाढला आहे. याचसोबत रुपया डॉलरच्या किंमतीत घसरत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
१६ मे रोजी मॉडर्न ब्रेडने बेसिक प्रकारांमध्ये प्रत्येक लादीमागे ५ रुपयांची वाढ केली आहे. यानंतर ब्रिटानिया आणि विब्स कंपन्यादेखील ब्रेडच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.
अंधेरितील लोखंडवाला येथील मिल्क ब्रेडचा स्टॉल असणाऱ्या राजू फुटणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मॉडर्नच्या ४०० ग्रॅम सँडविच लोफची किंमत ४० रुपये होती. ही किंमत आता ४५ रुपये झाली आहे. हेल व्हीटची किंमती ५५ रुपयांवरुन ६० रुपये झाली आहे. मल्टीग्रेनची किंमत ६० रुपयांवरुन ६५ रुपये झाली आहे. याआधी लहान ब्राउन पावची २८ रुपयांना होता, त्याची किंमत आता ३० झाले आहे. व्हाईट लोफची किंमत २० रुपयांवरुन २२ रुपये झाली आहे, याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिली आहे. ब्राउन ब्रेडची किंमत ४५ रुपयांवरुन ५० रुपये झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.