LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

LPG Gas Cylinder Supply Update: केंद्र सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. बनावट आणि निष्क्रिय गॅस कनेक्शन बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Gas Cylindersaam tv
Published On
  • LPG नियमांमध्ये आणखी मोठे बदल

  • केंद्र सरकारने LPG सबसिडीचे नियम आणखी कडक केले

  • १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्राहकांना सबसिडी मिळणार नाही

  • बनावट आणि निष्क्रिय गॅस कनेक्शन बंद करण्याची प्रक्रिया सुरू

एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण एलपीजीच्या नियमामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही गॅस सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. केंद्र सरकारने एलपीजी अनुदानाच्या नियम आणखी कडक केले आहेत. या नियमामुळे अनेकांना यापुढे अनुदान मिळणार नाही. बनावट आणि निष्क्रिय कनेक्शन कायमस्वरूपी कट केले जाणार आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, जर तुमचे उत्पन्न १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च उत्पन्न गटामध्ये समावेश केला जाईल. उत्पन्न जास्त असल्यामुळे तुम्हाला यापुढे गॅस सिलिंडरवर अनुदान मिळणार नाही. राजस्थानमध्ये सरकारकडून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये असे दिसून आले की ४०,००० पेक्षा अधिक ग्राहक हे उच्च उत्पन्न गटात मोडतात. त्यांचे उत्पन्न १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असताना देखील ते सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ घेत आहेत.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Rule Change: सर्वसामान्यांना दिलासा! गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात बदल होणार, कोर्टाच्या आदेशानंतर सरकार मोठा निर्णय घेणार?

केंद्र सरकार बनावट किंवा निष्क्रिय कनेक्शन असलेल्या ग्राहाकांनाही लक्ष्य करत आहे. अनेक कुटुंबांचे अकाऊंट मृत व्यक्तींच्या नावावर आहेत. नियमानुसार जर गॅसचा वापर अजूनही मृत व्यक्तीच्या नावावर होत असेल तर कुटुंबाने ३० दिवसांच्या आत कनेक्शन एका पात्र सदस्याच्या नावावर हस्तांतरित करणे गरजेचे आहे.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Mobile Update: LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ...तर तुमचा गॅस कनेक्शन होणार बंद, १० मिनिटांत घरबसल्या करा हे काम

जर तुम्हाला गॅस सबसिडी मिळत नसेल तर सर्वात आधी तुमचे बँक अकाऊंट आणि आधार कार्ड तुमच्या गॅस कनेक्शनशी जोडलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या. तुमच्या केवायसीची स्थिती तपासा. जर तुमचे उत्पन्न १० लाखांपेक्षा कमी असेल आणि तरी देखील तुम्हाला सबसिडी मिळाली नसेल तर त्यामागे अनेक तांत्रिक कारणे असू शकतात. तुम्ही अधिकृत MyLPG पोर्टलवर लॉग इन करून किंवा तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून तक्रार दाखल करू शकता.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com