Chandrika Dixit : 'वडा पाव गर्ल'नं केलं दुसरे लग्न? मिस्ट्री मॅनसोबत थाटला नवा संसार, 'त्या' फोटोंनी चर्चांना उधाण

Chandrika Dixit Second Wedding : 'वडा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितने दुसरे लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. तिने लग्नाचे फोटोशेअर केले आहेत.
Chandrika Dixit
Chandrika Dixitsaam tv
Published On
Summary

चंद्रिका दीक्षित ही 'वडा पाव गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहे.

चंद्रिका दीक्षितने दुसरे लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

चंद्रिका दीक्षितने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

गेल्या खूप दिवसांपासून 'वडा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षित तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलिकडेच चंद्रिकाने तिचा नवरा तिला धोका देत असल्याचे सांगितले होते. तसा आरोप तिने नवऱ्यावर केला होता. अशात आता चंद्रिकाने दुसरे लग्न केल्याचे माहिती समोर आली आहे. चंद्रिका दीक्षित 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये सहभागी होती.

चंद्रिका दीक्षितने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे. ज्यात ती मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर फोटोतील मिस्ट्री मॅनने शेरवानी परिधान केली आहे. दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहे. तिने या फोंटोना "Finally " असे खास कॅप्शन दिले आहे. तर फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.

चंद्रिका दीक्षितने इन्स्टाग्रामवर सहा फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती वधूच्या रुपात दिसत आहे. तिच्या डोक्यावर लाल ओढणी आहे. या पोस्टवर समिश्र कमेंट्स येत आहेत. काही नेटकरी त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर काही नेटकरी हे सर्व स्क्रिप्टेड असल्याचे , खोटे असल्याचे बोलत आहे.

चंद्रिका दीक्षितचे पहिले लग्न

चंद्रिका दीक्षितचे पहिले लग्न झाले आहे. तसेच तिला एक मुलगा देखील आहे. ज्याचे नाव रुद्र आहे. वडा पाव गर्लने तिच्या नवऱ्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. तिने त्याचे चॅट्स दाखवून दावा केला होता की, त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Chandrika Dixit
Bigg Boss Marathi 6 : "चल आपण लग्न करूया..."; राकेश बापटने बिग बॉसच्या घरात 'या' सदस्याला घातली लग्नाची मागणी, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com