Bigg Boss Marathi 6 : "चल आपण लग्न करूया..."; राकेश बापटने बिग बॉसच्या घरात 'या' सदस्याला घातली लग्नाची मागणी, पाहा VIDEO

Raqesh Bapat Talk On Marriage : बिग बॉसच्या घरात राकेश बापटने एका सदस्याला लग्नाची मागणी घातली आहे. तसेच आपल्या एक्स पत्नीविषयी बोलला आहे.
Raqesh Bapat Talk On Marriage
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

राकेश बापट बिग बॉसच्या घरात त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगला चर्चेत आहे.

राकेशने घरात एका सदस्याला लग्नाची मागणी घातली आहे.

राकेशने बिग बॉसच्या घरात आपले एक्स पत्नीसोबतचे नाते कसे आहे, याचा खुलासा केला आहे.

'बिग बॉस मराठी 6' चा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. पुन्हा एकदा कॅप्टन्सीची चढाओढ आणि नॉमिनेशनचा राडा पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून चार लोक बाहेर गेली आहेत. यात राधा पाटील, ओमकार राऊत, दिव्या शिंदे आणि सोनाली राऊत यांचा समावेश आहे. तर घरात धुमाकूळ घालायला पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. राखी सावंत घरात येताच नवीन राडा पाहायला मिळत आहे. अशात घरात सुरूवातीपासून एक त्रिकूट पाहायला मिळत आहे. राकेश, प्राजक्ता आणि दिपाली. राकेशने घरातील एका सदस्याला लग्नाची मागणी घातली आहे.

राकेश बापटला कशी मुलगी हवी?

राकेश आपल्याला कशी मुलगी हवी हे दिपाली सय्यद आणि प्राजक्ता शुक्रेला सांगत असतो. "तो बोलतो की, मी कधी लग्न केले, तर एका गायिकेशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन. ती सकाळी उठून, ओले केस मोकळे सोडून, साडी नेसून तानपुरा वाजवत असेल. तिला तसे गाताना मी बघत बसेन."

राकेश प्राजक्ताला घालतो लग्नाची मागणी

राकेश आपल्याला मुलगी कशी हवी हे सांगितल्यानंतर पटकन प्राजक्ताला म्हणतो की, "चल प्राजक्ता करून टाकू आपण लग्न. बोल आता... ओपन प्रपोजल देतो..., स्वप्न असे दिसतेय मला समोर..." त्यानंतर प्राजक्ता राकेशला गप्प करते. राकेश प्राजक्ता मधील संवाद प्राजक्ता करणला जाऊन सांगते.

राकेश एक्स पत्नी विषयी काय बोलतो?

राकेश बापट बिग बॉसच्या घरात असताना आपली एक्स पत्नी रिद्धि डोगरा विषयी बोलतो. राकेश म्हणतो, "आम्ही एकमेकांना चांगल समजून घ्यायचो. आमची मते वेगळी होती. एक लग्न झालेले जोडपे म्हणून आमचे जमले नाही. पण चांगले मित्र होतो. तिला कोणी मिळाले आणि मला पण कोण मिळाले तर अडकून नको राहायला. म्हणून आम्ही वेगळे झालो. आम्ही मुव्ह ऑन नाही झालो. रोज बोलतो. ती माझी चांगली मैत्रीण आहे..."

Raqesh Bapat Talk On Marriage
Famous Influencer Death : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची आत्महत्या, भाड्याच्या घरात आढळला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com