

उत्तर प्रदेशातील अहिबरनपुरा गावात घडली धक्कादायक घटना
दिराचं लग्न ठरल्याने वहिनी गेली नैराश्यात
लग्नाच्या दोन दिवस आधी वहिनीची आत्महत्या
पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास
उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील अहिबरनपुरा गावात दिराचं लग्न ठरल्याने वहिनीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. दिराचं लग्न ठरल्याने वहिनी नाराज होती. नाराज वहिनीने दिराच्या लग्नाच्या दोन दिवस आधी खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. वहिनीच्या मृत्यूने लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत महिलेच्या पतीने सांगितलं की, 'पत्नी पुष्पा देवी आणि लहान भावामध्ये अनैतिक संबंध होते. दोघांची जवळीक वाढल्याने लहान भावाला दुसऱ्या शहरात कामाला पाठवलं होतं. मी पत्नीसोबत वेगळ्या घरात राहत होतो'.
'पुष्पा देवी ही दोन मुलांची आई आहे. १० वर्ष आणि दुसरा ७ वर्षांची दोन मुले आहेत. यानंतरही पुष्पा देवीचे दिराशी अनैतिक संबंध सुरू होते. त्यात दिराचं लग्न ठरल्याने गेल्या काही दिवसांपासून नाराज होती, असे पुढे सांगितले.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
पुष्पा देवी दिर गावात आल्याने त्याला भेटायला गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर घरी आली. घरातील एका खोलीत आयुष्य संपवलं.
शेर सिंह आणि पुष्पा यांचं लग्न २०११ साली झालं होतं. शेर सिंह दुसऱ्या शहरात कामाला होता. आत्महत्या केलेल्या पुष्पा देवीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
पुष्पा देवीच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. या घटनेने लग्न घरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे, याचा सखोल तपास केला जात आहे. महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई निश्चित होणार आहे. पुष्पा देवीच्या मृत्यूने नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.