Bigg Boss 6: मराठीतला लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी ६' (Bigg Boss 19) अखेर सुरू झाला आहे. पाच सीझन गाजवल्यानंतर आता सहावा सीझन आज ११ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 'बिग बॉस मराठी ६' चे होस्टिंग मराठीतला लाडका भाऊ रितेश देशमुख करत आहे. 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड प्रिमियर सोहळा धमाकेदार अंदाजात पार पडला. या शोमध्ये 16 सेलिब्रिटी झळकले आहे. प्रत्येकाचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
रितेश देशमुखने यावेळी बिग बॉसचं घर प्रेक्षकांना दाखवलं. त्याने या घरात काय नविन असणार आहे हे सांगितले तसेच बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी यावेळी दोन वेगळे दार होते. यामध्ये एक मेहनतीचं दार आणि एक शॉर्टकट दार यामध्ये काही स्पर्धकांनी मेहनतीच्या दारांने एन्ट्री करत मेहनत निवडली तर काहींनी शॉर्टकट दार निवडून स्पेशल की आणि खास पावर मिळवली.
'बिग बॉस 19' सदस्यांची यादी
१) दिपाली सय्यद
२) सागर कारंडे
३) सचिन कुमावत
४) सोनाली राऊत
५) आयुष्य संजीव
६) तन्वी कोलते
७) करण सोनावणे
८) प्रभू शेळके
९) प्राजक्ता शुक्रे
१०) अनुश्री माने
११) रुचिता जामदार
१२) राकेश बापट
१३) रोशन भजनकर
१४) दिव्या शिंदे
१५) राधा पाटील
१६) विशाल कोटियन
१७) ओमकार राऊत
'बिग बॉस मराठी ६' कुठे पाहता येणार?
रितेश देशमुखचा 'बिग बॉस मराठी ६' शो आता सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री ९ वाजता कलर्स टिव्ही मराठीवर पाहायला मिळणार आहे.'बिग बॉस मराठी ६'ची यंदाची टॅगलाईन बिग बॉसचं दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 1मराठी ६ सीझन एकूण 105 दिवस सुरू राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.