वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Viral Wedding Video: 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती' या गाण्यावर नवऱ्याकडील आणि नवरीकडील सदस्यांनी मांडवात मिळून दिला भन्नाट डान्स परफॉर्मन्स. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून पाहणाऱ्यांचे भरभरून मनोरंजन करत आहे.
Viral Wedding Video
Saam Tv
Published On

Family Dance Performance: लग्न म्हटलं की फक्त विधी, परंपरा, साखरपुडा, वरात आणि सात फेरे एवढंच नव्हे तर आनंद, हास्य, थट्टा-मस्करी आणि आजकाल तर व्हायरल व्हिडिओ देखील महत्त्वाचा भाग ठरतोय. सोशल मीडियावर सध्या एका अशाच लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवऱ्याकडील आणि नवरीकडील मंडळी मांडवात लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती या प्रसिद्ध गाण्यावर मिळून नाचताना दिसत आहेत. पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय.

मांडवात धमाल वातावरण

मंडपाच्या सजलेल्या रंगमंचावर, वरपक्ष आणि वधूपक्षातील नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि अगदी वयस्कर सदस्यसुद्धा उत्साहात नाचताना दिसतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू, जल्लोष, आनंद आणि मोकळेपणा स्पष्ट दिसतो. वराच्या बहिणीपासून ते नवरीच्या मामापर्यंत प्रत्येक जण ठेका धरतोय आणि तेही 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती' या गाण्यावर. हिंदी चित्रपटातील हे गाणं सध्या लग्न (Wedding) समारंभांमध्ये धमाल निर्माण करत आहे आणि याच गाण्याने येथेही रंगत वाढवली

गाणं सुरू होताच वाढला जल्लोष

गाण्याची सुरुवात होताच, आधी काही महिला आणि तरुणी नाचायला पुढे येतात. त्यानंतर हळूहळू एक एक करून बाकी सदस्यही सहभागी होतात. कोणी पारंपरिक साडीमध्ये नाचतोय, तर कोणी लेहेंगा किंवा सूटमध्ये स्टेप्स करताना दिसतोय. मुलींच्या एका गटाने ठरवून केलेला कोरियोग्राफ डान्स आणि त्याला उत्तर देत वरपक्षातील तरुणांचा फ्रीस्टाइल नाच यामुळे कार्यक्रमात हास्य आणि जल्लोषाचं वातावरण पसरलं.

सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ पाहताच अनेकांनी त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला. कोणी म्हणालं, "असंच लग्न पाहिजे", तर कोणी लिहिलं, "आजकाल अशा उत्साही कुटुंबांमुळे लग्नं विशेष बनतात." काही यूजर्सनी डान्स करणाऱ्यांची तारीफ केली आहे. हा डान्स(Dance) व्हिडिओ इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुकवरही तुफान व्हायरल झालाय

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Wedding Video
तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com