.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर
पेट्रोल डिझेल महागलं
वाचा महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर
देशात सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहे. त्याचाच परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर होताना दिसत आहे. दरम्यान, आता यामध्येच पेट्रोल डिझेलवरील आयात कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हे दर भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर ३ रुपयांचा अतिरिक्त नफा कर लावला आहे. हा इंधन कंपन्यांसाठी मोठा झटका असेल. याचाच अर्थ असा की, पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल निर्यात केले तर त्यावरील नफ्यावर सरकारला ३ रुपये कर भरावा लागणार आहे.
रोज सकाळी सरकारी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. आजदेखील पेट्रोलचे दर जाहीर करण्यात आले आहे. राज्यात पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर काही ठिकाणी डिझेलचे आतापर्यंतचे सर्वाधिक दर वाढले आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय? (Petrol Diesel Price Today)
आज दिल्लीत पेट्रोलचे दर ९७.७७ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ९०.६७ रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचे दर १०६.६८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.१४ रुपये प्रति लिटर आहेत. कोलकत्तामध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. हे दर १०८.७४ रुपये प्रति लिटर आहेत.
महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price in Maharashtra)
पुण्यात पेट्रोलचे दर १०७.४३ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.९२ रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोलचे दर १०६.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९३.४६ रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०७.९० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.३८ रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर १०७.६६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.१७ रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलचे दर १०८.१९ रुपये तर डिझेलचे दर ९४.६४ रुपये प्रति लिटर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.