Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

Pakistan Fuel shortage News : पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मध्यरात्रापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Pakistan Petrol and Diesel Prices Cross ₹415 : ऐन मध्यरात्री घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आयएमएफच्या जाचक अटींचा परिणाम म्हणून पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर अचानक वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल १५ रुपयांची वाढ करण्यत आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर 415 रुपयांच्या पुढे गेले आहेत. होर्मुझचा जलमार्ग बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक पुरवठा टंचाईचा थेट फटका पाकिस्तानला बसत असल्याचं सांगितलं जात आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता पसरली असून दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com