Panvel Missing Girl News: २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं गुढ उलगडलं; पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Panvel News Latest News: पनवेलमधील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह गुरूवारी (३१ ऑगस्ट) रायगडमधील एका खाडीत आढळून आला.
Panvel Missing Girl Death Latest News
Panvel Missing Girl Death Latest NewsSaam TV

Panvel Missing Girl News: पनवेलमधील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह गुरूवारी (३१ ऑगस्ट) रायगडमधील एका खाडीत आढळून आला. प्रियांका तांडेल (वय २० वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. मच्छिमारांना प्रियांकाचा मृतदेह खाडीत दिसल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.  (Latest Marathi News)

Panvel Missing Girl Death Latest News
Gas Cylinder Price: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; गॅस सिलिंडरच्या दरात १५७ रुपयांची घसरण, पाहा नवे दर

दरम्यान, प्रियांकाच्या मृत्युची चौकशी करत असताना पोलिस तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आई-बाबा मोबाईल वापरण्यावरून ओरडतात म्हणून प्रियांका घर सोडून गेली होती. त्यानंतर तिने रागाच्या भरात समुद्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली, असं तपासात समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील (Panvel Missing Girl) कासारभाट गावात राहणारी प्रियांका २३ ऑगस्टला घरातून अचानक निघून गेली होती. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नसल्याने घरातल्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि आपली मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली.

Panvel Missing Girl Death Latest News
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दोन तासांचा विशेष ब्लॉक; वाहतुकीचे पर्यायी मार्ग कोणते?

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी प्रियांकाचा शोध सुरू केला. दरम्यान, ७ दिवसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पत्रात सापडला. रात्रीच्या वेळी मच्छिमारी करताना एका मच्छिमाराला एका अज्ञात युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

मच्छिमारांनी तातडीने या घटनेची माहिती जवळच्या पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com