Gas Cylinder Price: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; गॅस सिलिंडरच्या दरात १५७ रुपयांची घसरण, पाहा नवे दर

Update on Gas Cylinder Price: महागाईने पिचलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.
Good News Commercial gas cylinder rate reduced by 157 Rs Gas Cylinder Latest Price In maharashtra
Good News Commercial gas cylinder rate reduced by 157 Rs Gas Cylinder Latest Price In maharashtraSaam TV
Published On

Gas Cylinder Latest Price:

महागाईने पिचलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. सिलिंडरचे दर तब्बल १५७ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Latest Marathi News)

Good News Commercial gas cylinder rate reduced by 157 Rs Gas Cylinder Latest Price In maharashtra
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दोन तासांचा विशेष ब्लॉक; वाहतुकीचे पर्यायी मार्ग कोणते?

सरकारी तेल कंपन्यांनी १ सप्टेंबर रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. नव्या किंमतीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात आज कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल १५७ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

या बदलामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत १५२२.५० रुपये झाली आहे. यापूर्वी या व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Cylinder Price) किंमत १७८० रुपयांवर पोहोचली होती. दरम्यान, राखी पौर्णिमेच्या एका दिवस आधी म्हणजेच मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी कपात करण्यात आली होती.

Good News Commercial gas cylinder rate reduced by 157 Rs Gas Cylinder Latest Price In maharashtra
Ganapati Special Trains: कोकणवासियांसाठी गुड न्यूज, आता तिकिट होणार कन्फर्म; 'या' दोन रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे

अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल. दरम्यान, ३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर किती?

दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५७ रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत १५२२.५० रुपये इतकी झाली आहे. याआधी दिल्लीत गॅस सिलिंडर १६८० रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये आजपासून सिलिंडर १८०२.५० रुपयांऐवजी १६३६ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी त्याची मुंबईत किंमत १६४९.५० रुपये होती, जी आता १४८२ रुपयांवर आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com