ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, मोठी खळबळ

Operation Tiger Shinde Sena Legal Challenge Against UBT Corporators: ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण! ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला शिंदेसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
16 Uddhav Thackeray faction corporators facing election petitions
16 Uddhav Thackeray faction corporators facing election petitionssaam tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांभोवतीचं कायदेशीर संकट अधिक गडद होताना दिसत आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणखी तब्बल १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या याचिका संबंधित प्रभागातील शिंदेसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून दाखल करण्यात आल्या आहेत.

16 Uddhav Thackeray faction corporators facing election petitions
Sanjay Raut On Modi | इंदापुरातील मेळाव्यातून राऊतांचा भाजप- मोदींवर हल्लाबोल! | Marathi News

नगरसेवकांनी निवडणूक अर्ज भरताना जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती तसेच गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवली, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या माध्यमातून मतदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. याआधी प्रभाग क्रमांक १११ मधील दीपक सावंत यांचं नगरसेवकपद जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर रद्द झालं. त्यानंतर प्रभाग क्रमांक १९१ मधील विशाखा राऊत यांच्यावरही अपात्रतेची कारवाई झाली. राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने त्यांचं नगरसेवकपद रद्द केलं.

16 Uddhav Thackeray faction corporators facing election petitions
महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याची उपपंतप्रधानपदी वर्णी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

विशाखा राऊत यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या प्रिया सरवणकर यांनी आक्षेप घेतला होता. राऊत यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्या नगरसेवकपदावरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला. आता आणखी १६ नगरसेवकांविरोधातील निवडणूक याचिकांमुळे ठाकरे गटाच्या गोटात चिंता वाढली आहे. या याचिकांमध्ये करण्यात आलेले आरोप न्यायालयात सिद्ध होतात का, संबंधित नगरसेवकांना दिलासा मिळतो का आणि या प्रकरणांचा त्यांच्या पदावर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

16 Uddhav Thackeray faction corporators facing election petitions
'१७ सप्टेंबरनंतर देशात राजकीय भूकंप होणार'; मोदी-शाह यांच्याबाबत बड्या नेत्याचं धक्कादायक भाकीत

त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल सुरू आहे का? असा राजकीय सवाल उपस्थित होत असून, कायदेशीर आव्हानांच्या माध्यमातून ठाकरे गटावर दबावाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही केला जात आहे. दोन नगरसेवकांचे पद गेल्यानंतर आता आणखी १६ नगरसेवकांचं भवितव्य न्यायालयाच्या कचाट्यात आलं आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांचं पद कायम राहतं की त्यांच्यावरही अपात्रतेची कारवाई होते, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कोणत्या नगरसेवकांचं पद धोक्यात?

प्रभाग क्रमांक - १२१

प्रतिमा शैलेश खोपडे (शिंदे सेना) vs प्रियदर्शिनी ठाकरे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक- ६२

राजू पेडणेकर (शिंदेसेना) vs झिशान मुल्तानी (UBT) विजयी (स्वतःविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप तसंच एबी फॉर्मवर खोटी सही)

प्रभाग क्रमांक - ९३

सुमित वाजळे (शिंदेसेना) vs रोहिणी कांबळे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - १२

सुवर्णा गावस (शिंदेसेना) vs सारिका झोरे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - ७३

दीप्ती पोतनीस (शिंदेसेना) vs लोना रावत (UBT) विजयी (संपत्ती लपवल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक - १२०

राजराजेश्वरी रेडकर (शिंदेसेना) vs विश्वास शिंदे (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - २०६

संजय (नाना) आंबोले (शिंदेसेना) vs सचिन पडवळ (UBT) विजयी (मतमोजणी वेळी निवडणूक अधिकाऱ्यासोबत संगनमत केल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक - २०३

समिधा भोळेकर (शिंदेसेना) vs भारती पेडणेकर (UBT) विजयी (मतमोजणी वेळी निवडणूक अधिकाऱ्यासोबत संगनमत केल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक - ७७

प्रियांका आंबोलकर (शिंदेसेना) vs शिवानी परब (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - ८९

राजेश नाईक (शिंदेसेना) vs गीतेश राऊत (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - २०८

विजय लिपारे (शिंदेसेना) vs रमाकांत रहाटे (UBT) विजयी (संपत्ती लपवली असा आरोप)

प्रभाग क्रमांक - १९८

वंदना गवळी (शिंदेसेना) vs अबोली खाड्ये (UBT) विजयी (शिक्षण तसंच गुन्हे लपवल्याचा आरोप)

प्रभाग क्रमांक - ४१

मानसी पाटील (शिंदेसेना) vs सुहास वाडकर (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - ९४

पल्लवी पै (शिंदेसेना) vs प्रज्ञा भुतकर (UBT) विजयी

प्रभाग क्रमांक ५३

अशोक खंडवे (शिंदेसेना) vs जितेंद्र वाळवी (शिवसेना UBT) विजयी

प्रभाग क्रमांक - १८७

शेख वकील सागीर अहमद (शिंदेसेना) vs जोसेफ कोळी (UBT) विजयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com