मध्यरात्री राष्ट्रवादीच्या नेत्याने रस्त्यावर टेबल टाकून केक कापला, फटाक्यांची आतषबाजी; मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल

NCP Former Corporator Birthday Controversy Pune Yerwada: पुण्यात मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करत फटाके फोडल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Former NCP corporator celebrates birthday on a public road in Yerwada, Pune; police register case against seven individuals.
Former NCP corporator celebrates birthday on a public road in Yerwada, Pune; police register case against seven individuals.saam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. येरवड्यात रस्त्यावर टेबल टाकून केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक, तसेच त्यांच्या मुलासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Former NCP corporator celebrates birthday on a public road in Yerwada, Pune; police register case against seven individuals.
डेटिंग अ‍ॅपवर मैत्रीच्या जाळ्यात अडकला, गुंतवणुकीच्या आमिषाने 7 कोटी रुपये गमावून बसला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक किशोर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय २८), गणेश पोपटराव ढोकळे (वय ४०), गणपत जिवराज पुरोहित (वय ५१), विकास मच्छिंद्र सोनवणे (वय ४०), रोहित मधुकर वैराळ (वय ३५, सर्व रा. येरवडा) आणि रामेश्वर अरुण दुर्लेकर (वय ३२, रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी बलजीत थोरात यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Former NCP corporator celebrates birthday on a public road in Yerwada, Pune; police register case against seven individuals.
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून मुख्याध्यापिकेला अटक

मध्यरात्री रस्त्यावर झाली आतषबाजी

किशोर विटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असून येरवड्यातील गाडीतळ परिसरात त्यांचे कार्यालय आहे. शुक्रवारी (ता. २२) विटकर यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर टेबल टाकून केक कापण्यात आला. तसेच यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Former NCP corporator celebrates birthday on a public road in Yerwada, Pune; police register case against seven individuals.
Dombivali: ८ वर्षांचे प्रेम, प्रेमी युगुलांनी कोर्टात लग्न केलं, मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांसमोर लग्न लावतो म्हणत नेलं अन्...

वाहतुकीस अडथळा आणि शांततेचा भंग

मध्यरात्री झालेल्या या जल्लोषामुळे परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग झाला. तसेच रस्त्यावर टेबल टाकल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांच्या गस्ती पथकाला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि स्थानिक भागात एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधींनीच अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com