

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिकेला अटक
भौतिकशास्त्र पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा
एनटीए तज्ज्ञ मनिषा हवालदार अटकेत
पुणे कनेक्शन असलेले नीट घोटाळ्याचे अपडेट
नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिका मनिषा हवालदार यांना सीबीआयने अटक केली. मनिषा हवालदार या भौतिकशास्त्राचा पेपर फोडणाऱ्या मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या मनिषा मांढरे आणि मनिषा हवालदार या दोघींचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे.
मनिषा हवालदार एनटीएमध्ये तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मनिषा हवालदारने मनिषा मांढरेला भौतिकशास्त्राचे पेपर दिले. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर एनटीएने सीबीआयला भौतिकशास्त्राचा पेपर पण फुटला असल्याची माहिती दिली होती. सीबीआयने मनिषा हवालदार यांची चौकशी केल्यानंतर हे सगळं वास्तव समोर आलं आहे.
नीट पेपर फुटीप्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील सेठ हरिलाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विद्या प्रसारिणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर हवालदार यांचे निलंबन करण्यात आले. मनिषा हवालदार यांनी केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनाकडून निषेध करण्यात आला आहे.
मनिषा हवालदार या पुण्यातील सेठ हरिलाल सराफ प्रशालेच्या त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. हवालदार यांचे एम.एस्सी बी.एड असे शिक्षण झाले असून त्यांनी मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम केलं आहे. १९९२ मध्ये विद्या प्रसारिणी सभेच्या भारत इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका म्हणून त्या रूजू झाल्या. याच महाविद्यालयात १९९२ ते २०२४ पर्यंत त्या शिक्षिका म्हणून भौतिकशास्त्र विषय शिकवत होत्या. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना सेठ हरिलाल सराफ प्रशालेत मुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती देण्यात आली.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मनिषा हवालदार यांनी भौतिकशास्त्राच्या पेपरची प्रत मांढरे यांना दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मनिषा हवालदार यांचा थेट एनटीएमध्ये सहभाग असल्याने त्यांना भौतिकशास्त्राच्या पेपरची सर्व माहिती होती. सीबीआयने मनिषा हवालदार यांची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक केली असून यामधील ४ जण हे पुण्यातील आहेत. यामध्ये ४ महिलांचा समावेश आहे.
पी. व्ही. कुलकर्णी: पुणे
मनीषा वाघमारे: पुणे
मनिषा मांढरे: दिल्ली
शुभम खैरनार: नाशिक
धनंजय लोखंडे: अहिल्यानगर
यश यादव: गुरुग्राम
मांगीलाल बिवाल: जयपूर
विकास बिवाल: जयपूर
दिनेश बिवाल: जयपूर
डॉ राहुल शिरुरे: पुणे
मनिषा हवालदार: पुणे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.