पोलिसांची नजरचूक, भलत्याच व्यक्तीचा गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर; कोर्टात नेमकं काय घडलं?

vikas lawande news : विकास लवांडे यांच्या नावावर भलत्या माणसाचा गुन्हा दाखवल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणानंतर पोलिसांवर जोरदार टीका होऊ लागली आहे.
vikas lawande news update
vikas lawande news Saam tv
Published On
Summary

विकास लवांडेंच्या नावावर भलत्याच माणसाचा गुन्हा

लवांडेंनी जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतल्यानंतर प्रकार उघडीस

रिपोर्ट उघडकीस झाल्यानंतर पोलिसांच्या कारभारावर टीका

सागर आव्हाड, साम टीव्ही

शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना काही दिवसांपूर्वी वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर लवांडे यांनी जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली. परंतु कोर्टात भलत्याच माणसावर असलेला गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर दाखवल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणावरून पोलीस यंत्रणेवर टीका होऊ लागली आहे.

पुणे पोलिसांनी विकास लवांडे यांच्यावर नसलेला गुन्हा दाखवल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये गौतम कांबळेच्या नावावर दाखल असलेला गुन्हा लवांडेंच्या नावावर दाखवण्यात आलाय. पोलिसांनी जामीन अर्जाला विरोधात कांबळेच्या नावावरील गुन्हा दाखवला. मात्र, आता पोलिसांनी नजरचुकीने झालं असल्याचे म्हटलं आहे. जो गुन्हा विकास लवांडे यांनी केलाच नाही, तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवल्याने राजकीय वर्तुळातून पोलिसांवर टीका होऊ लागली आहे.

vikas lawande news update
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फटका अनाथ मुलांना, निधी वळवल्यामुळे १२ महिन्यांपासून लाखो मुलांना लाभ नाही

पुणे पोलिसांनी नसलेला गुन्हा लवांडे यांच्यावर दाखवला, त्यामुळे कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज राखून ठेवला. विकास लवांडे यांच्यावर गुन्हा क्रमांक ३२ ( २०१७ ) दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी ३३( २०१७ ) चा गुन्हा दाखवला आहे. ज्या गुन्ह्यात विकास लवांडे आरोपी नाहीत. पोलिसांनी ते नजर चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेताच विकास लवांडेंनी काय म्हटलं?

विकास लवांडे यांनी म्हटलं की, 'पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे आणि इतर सर्व आरोपी मोकाट आहेत. पण वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले. त्यावेळी मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला, कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा माझा सवाल आहे? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही'.

vikas lawande news update
राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

'शासनाने मला जरूर अटक करावी, मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे. कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे. कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन ,वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, असे लवांडे यांनी पुढे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com