डेटिंग अ‍ॅपवर मैत्रीच्या जाळ्यात अडकला, गुंतवणुकीच्या आमिषाने 7 कोटी रुपये गमावून बसला

Dating App Forex Scam Businessman Loses-7 Crore: डेटिंग अॅपवरील ओळखीचा गैरफायदा घेत एका उद्योजकाची तब्बल 7 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत आरोपींनी मोठा घोटाळा केला असून सायबर पोलिस तपास सुरू आहे.
Businessman falls victim to a massive ₹7 crore forex scam after being lured through a dating app connection.
Businessman falls victim to a massive ₹7 crore forex scam after being lured through a dating app connection.saam tv
Published On

पुणे: डेटिंग अ‍ॅपवर झालेली ओळख आणि त्यातून निर्माण झालेला विश्वास एका उद्योजकासाठी मोठा आर्थिक धक्का ठरला आहे. परकीय चलन व्यवहारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका महिलेने 53 वर्षीय उद्योजकाची तब्बल 7 कोटी 7 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित उद्योजकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Businessman falls victim to a massive ₹7 crore forex scam after being lured through a dating app connection.
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून मुख्याध्यापिकेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ही वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीचा व्यवसाय करणारे उद्योजक आहेत. 2025 मध्ये त्यांची एका डेटिंग अ‍ॅपवर महिलेबरोबर ओळख झाली. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवादातून महिलेने त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर महिलेने परकीय चलन व्यवहार (फॉरेक्स ट्रेडिंग) मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे सांगत उद्योजकाला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. तिच्या सांगण्यावरून त्यांनी एका अ‍ॅपवर खाते उघडले आणि दिलेल्या सूचनानुसार विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सुरूवात केली.

Businessman falls victim to a massive ₹7 crore forex scam after being lured through a dating app connection.
11th Admission 2026: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत उद्योजकाने टप्प्याटप्याने एकूण 7 कोटी 7 लाख 61 हजार रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. दरम्यान संबंधित अ‍ॅपवर गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळाल्याचे दिसत असल्याने त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. मात्र, जेव्हा त्यांनी हा परतावा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रक्कम मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

Businessman falls victim to a massive ₹7 crore forex scam after being lured through a dating app connection.
Dombivali: ८ वर्षांचे प्रेम, प्रेमी युगुलांनी कोर्टात लग्न केलं, मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांसमोर लग्न लावतो म्हणत नेलं अन्...

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना तसेच ऑनलाईन गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com